Post Office Scheme : सध्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही शेअर मार्केट, खाजगी तसेच सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. अनेकजण सर्वात जास्त परतावा आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात.
सध्या काही योजना अशा आहेत ज्या महिलांना श्रीमंत बनवतात. आता तुम्ही देखील या योजनांमध्ये गुंतवणूक करून मालामाल होऊ शकता. विशेष म्हणजे या योजनेमध्ये जबरदस्त परतावा मिळत आहे. यात तुम्हाला कोणतीही जोखीम घ्यावी लागत नाही. जाणून घ्या अधिक.
पीपीएफ योजना
पीपीएफ योजनेबद्दल सांगायचे झाले तर ही दीर्घकालीन बचत योजना असून यात गुंतवणूक करून सर्व महिला त्यांचे भविष्य सुरक्षित ठेवू शकतील. या योजनेअंतर्गत, तुम्हाला सरकार जमा केलेल्या रकमेवर 7.1 टक्के दराने व्याज देईल. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही या योजनेत 15 वर्षांसाठी प्रत्येक वर्षी 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 31 लाख रुपयांपर्यंत शानदार परतावा मिळेल.
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना ही पोस्ट ऑफिसद्वारे चालवली जाणारी एक योजना असून जी महिलांना गुंतवणुकीवर चांगला निधी प्रदान करते. खास करून ही योजना मुलींसाठी चालवण्यात येत आहे. या योजनेमध्ये तुम्ही तुमच्या 10 वर्षांच्या मुलीच्या नावावर खाते चालू करू शकता. तसेच या खात्यामध्ये तुम्ही कमीत कमी 250 ते 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. या योजनेत सरकार ८ टक्के दराने व्याज देते.
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
हे लक्षात घ्या की राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना महिलांसाठी उत्तम पर्याय असेल. या योजनेंतर्गत तुम्हाला 100 रुपयांपासून तुम्हाला हव्या त्या रकमेपर्यंत गुंतवणूक करता येईल. यात जमा करण्यात आलेल्या रकमेवर 7.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या योजनेचा एकूण कालावधी एकूण 5 वर्षांचा आहे.
महिला सन्मान बचत योजना
सरकारने ही योजना विशेषत: महिलांसाठी सुरू केली आहे. या योजनेमध्ये महिलांना 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ज्यात सरकारकडून 7.5 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेचा कालावधी 2 वर्षांचा आहे.
टाइम डिपॉझिट योजना
तसेच पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना महिलांसाठी गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला खात्यामध्ये ठराविक रक्कम जमा करता येईल. शिवाय पोस्ट ऑफिस 5 वर्षांच्या कालावधीवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते.