ताज्या बातम्या

Post Office Scheme: ‘या’ योजेत होणार बंपर कमाई ! मिळणार 34 लाखांचा परतावा ; फक्त 50 रुपयांपासून सुरु करा गुंतवणूक

Post Office Scheme: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्ट ऑफिस नेहमीच एका पेक्षा एक जबरदस्त योजना सादर करत असते. या योजनेतू आता पर्यंत अनेकांनी मोठा आर्थिक लाभ प्राप्त केला आहे. तुम्ही देखील तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका भन्नाट योजनाबद्दल माहिती देणार आहोत.

या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून बंपर कमाई करू शकतात. आम्ही येथे “ग्राम सुरक्षा योजना” बद्दल बोलत आहोत . यात 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.चला तर जाणून घ्या या जबरदस्त योजनाबद्दल संपूर्ण माहिती.

इतक्या रुपयात सुरु करा गुंतवणूक

पोस्ट ऑफिसने ऑफर केलेल्या या योजनेत शून्य धोका आहे. ग्राम सुरक्षा योजनेत दरमहा 1500 रुपये जमा करावे लागतात. यामध्ये, किमान विम्याची रक्कम 10000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असते. गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला रु. 1500 नुसार दररोज 50 रुपये गुंतवावे लागतात. तुम्ही नियमितपणे गुंतवणूक केल्यास काही वर्षांत तुम्हाला 30-35 लाख रुपयांचा परतावा मिळू शकतो.

गुंतवणूकदार ही रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियममध्ये भरू शकतात. एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत ग्राहकांना कर्जाची सुविधाही मिळते. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 3 वर्षानंतर ही योजना सरेंडर करू शकता.

ही गणना आहे जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 19 व्या वर्षी ग्राम सुरक्षा योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी खरेदी केली, तर त्याला 55 वर्षे दरमहा रु. 1515 गुंतवणुकीवर 31.60 लाखांचा परतावा मिळतो. 58 वर्षांसाठी दरमहा 1463 रुपयांची गुंतवणूक केल्यास 33.40 लाख रुपयांचा नफा मिळतो. आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपयांच्या मासिक प्रीमियमवर, 34.60 लाख रुपयांचा फायदा आहे.

अस्वीकरण: या बातमीचा उद्देश फक्त शिक्षित करणे आहे. आम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाही. यामध्ये धोका असू शकतो, त्यामुळे तज्ञांचा सल्ला जरूर घ्या.

हे पण वाचा :- 7th Pay Commission: कर्मचार्‍यांसाठी 2023 ठरणार लकी ! ‘या’ 3 निर्णयांमुळे खिशात येणार बंपर पैसा

Ahmednagarlive24 Office

Recent Posts