जिल्ह्यातील ‘ या’ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांच्या बदलीला स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची बदली नाशिक ग्रामीण या विभागात करण्यात आली होती. मात्र या बदलीला स्थगिती मिळाली आहे.

दौलतराव जाधव यांनी कोपरगाव मध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये अतिशय शिस्तबद्ध काम केले तसेच ग्रामीण भागातील गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसवला त्यामुळे कोपरगाव पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी कमी कालावधीमध्ये सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य निर्माण केले आहे.

अशा कर्तबगार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांची बदली रद्द करून कोपरगावसाठी कार्यकाळ वाढवावा अशी मागणी शिवसूत्र युवा प्रतिष्ठानने राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली होती ही मागणी मान्य करत अखेर ती रद्द झाली आहे.

त्याबद्दल शिवसूत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,भाजपा युवा उपअध्यक्ष सुधाकर वक्ते म्हणाले कि, प्रशासन हे सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेतात व त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो.

पोलिस निरीक्षिक दौलतराव जाधव यांच्यासारख्या संयमी व शिस्तबद्ध अधिकाऱ्याची कोपरगावला गरज आहे. त्यांची बदली रद्द केल्या बद्दल शिवसुत्र युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,भाजपा युवा उपअध्यक्ष सुधाकर वक्ते,उपअध्यक्ष विशाल गुरसळ, प्रदिप गायकवाड,

राहुल चव्हाण, राहुल वक्ते, मधुकर वक्ते, किरण चव्हाण,विक्रम चव्हाण, विकी जगताप, गौतम गायकवाड, ऋषीकेश वक्ते, ऋषी गुरसळ, कुलदीपक वक्ते विश्वजीत वक्ते, गौतम गायकवाड, सौरव पवार, किशोर गायकवाड, प्रदिप वक्ते, राहुल देवकर, साईनाथ वायकर, खंडू गांगुर्डे,किरण वक्ते,

पोपट सोळके, अजय सुपेकर यांच्यासह विजय आढाव, पराग संधान, प्रसाद नाईक, प्रशांत होन, संदीप देवकर, बापू साहेब, सुरळकर, संदीप शिरोडे, दिनेश कोल्हे, विवेक खांडेकर, संतोष नेरे, प्रशांत निकुंभ, संतोष पवार, नितीन त्रिभुवन, उमेश लोंढे,

उमेश गोसावी, प्रशांत शहाणे, कैलास शेळके, बाळासाहेब निकाले, केशवराव होन, अनिल मुसमाडे, बाळासाहेब कदम, दिपक सुपेकर यांच्यासह कोपरगांव तालुक्यातील सायकल वारी चे सर्व सभासद प्रशासनाचे आभार मानले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts