Powerful Solar Generator : उन्हाळ्याच्या दिवसात वीज मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्यामुळे नेहमीपेक्षा सर्वांचे महिन्याचे वीजबिल जास्त येते. साहजिकच त्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडते. अशातच सध्याच्या काळात महागाई वाढत चालली आहे.
त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर दुहेरी संकट येत आहे. परंतु, तुम्ही आता कितीही वीज वापरली तरी तुम्हाला वीजबिल येणारच नाही. कारण बाजारात सध्या सौर जनरेटर उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सौर जनरेटर तुम्हाला कोठेही नेता येते. त्याशिवाय ते वजनाने खूप हलके आहे.
या सौरऊर्जेवर चालत असणाऱ्या जनरेटरमध्ये 100 वॅटचे एसी आउटपुटही उपलब्ध आहे. इतकेच नाही तर यात फास्ट चार्जिंग ली-आयन बॅटरी वापरली आहे. त्याच्या आत एक LED लाईट बसवली असून जी तुम्हाला तुमच्या गरजेनुसार वापरता येते.
काय आहे खासियत?
या जनरेटरची क्षमता 130 वॅट इतकी आहे, ज्यामुळे ते तुमचे डिव्हाइस चार्ज करण्यास सक्षम आहे. UPS प्रमाणे, ग्राहक याला सौरऊर्जेवर चालणारे जनरेटर म्हणून वापरू शकतात. तसेच त्यांच्या उपकरणांना वीज पुरवू शकतात, परंतु ते आकाराने लहान आहे, इतकेच नाही तर आता या जनरेटरच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन पॉवर बँक आणि इतर उपकरणांवर अनेक वेळा चार्ज करू शकता.
जर गरज भासली तर तुम्ही हे पोर्टेबल सौरऊर्जेवर चालणारे जनरेटर कुठेही नेऊ शकता, तसेच त्याचा कुठेही वीज पुरवठा करण्यासाठी तुम्ही वापर करू शकता. हे पोर्टेबल सौर उर्जेवर चालणारे जनरेटर 2 AC कनेक्टर पोर्टसह येते जे तुमचे डिव्हाइस चार्ज करण्यासाठी वापरण्यात येऊ शकते. हे पोर्ट उत्तम प्रकारे काम करण्यास सक्षम असून त्याची किंमत रु.17,999 आहे. जर तुम्हाला ते खरेदी करायचे असेल तर तुम्ही अॅमेझॉन या ऑनलाइन वेबसाइटवरून तुम्ही ते खरेदी करू शकता.