मुंबई : भाजप (BJP) नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांच्यावर मुंबई बँक (Mumbai Bank) घोटाळ्याच्या आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यावरून भाजप आणि महाविकास आघडीमध्ये चांगलेच राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे.
मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी मुंबै बँक प्रकरणी संचालक मंडळ बरखास्त करून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांना जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे.
यावरूनच प्रवीण दरेकर चांगलेच भडकल्याचे दिसत आहेत. ते म्हणाले, विरोधी पक्ष नेत्याचे नाव घेताना नोटीस देणं आवश्यक आहे. कुणीही धुतल्या तांदळासारखे नाही, चूक असेल तर आम्ही तुरुंगात जाऊ.
आमच्यासोबत महाराष्ट्रातील (Maharashtra) लोक तुरुंगात जातील. पण, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर बोलणं उचित नाही असे म्हणत प्रवीण दरेकर यांनी मनीषा कायंदे आणि आघाडीवर (Mahavikas Aghadi) निशाणा साधला आहे.
मनीषा कायंदे यांची काय मागणी आहे?
मुंबै बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी रिझर्व्ह बँकेनं अहवाल दिला आहे. या अहवालात म्हटलंय की, मुंबै बँकेला बरखास्त करा आणि प्रशासक नेमा.
यावरुन मुंबै बँकेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करुन भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगात पाठवा. अशी मागणी त्यांनी केली आहे.