अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2022 :- गर्भधारणेवेळी आईच्या पौष्टिक आहाराद्वारे गर्भाचे पोषण होते. त्यामुळे गर्भधारणेवेळी सकस आहार घेणे गरजेचे असते. चांगला आहारानेच होणाऱ्या बाळाचे व आईचे पोषण होते.
जर पुरेसे पोषण मिळाले तरनिरोगी बाळ जन्माला येईल. त्यामुळे आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अशा वेळी स्त्रीने गर्भधारणेदरम्यान काही गोष्टींचे सेवन करणे आवश्यक आहे.तर जाणून घेऊया गरोदर स्री आणि होणाऱ्या बाळासाठी फायदेशीर आहार.
गरोदरपणात स्त्रीने काय खावे?
पालक: पाले भाज्यांमध्ये जास्तीत जास्त पोषक घटक असतात. यामध्ये पालकभाजी खाणे खूप फायदेशीर आहे. पालकमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि अनेक खनिजे असतात. गर्भाच्या वाढीसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी पालकचे सेवन आवश्यक आहे. हे न जन्मलेल्या बाळाचे आरोग्य चांगले ठेवते.
अंडी: अंडी शरीरासाठी पौष्टिक असतात. अंड्यांमध्ये प्रथिनांसह जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाणही जास्त असते. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे आहे. त्यामुळे गर्भवती महिलांनी अंडी अंडी खाणे गरजेचं आहे.
बदाम:बदामामध्ये अनेक पोषक घटक असतात. बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. हे गर्भवती महिला आणि त्यांच्या बाळांना देखील लागू होते. बदामामध्ये पोषक तत्वे आढळतात. गरोदरपणात स्त्रीने बदाम खावे. यामुळे मुलाच्या मेंदूचा विकास होतो.
ताजी फळे:ताजी फळे आरोग्यासाठी नेहमी फायदेशीर ठरतात. ताज्या फळांपासून जीवनसत्त्वे मिळतात. अशा स्थितीत गरोदरपणात स्त्रीने संत्री, केळी, आंबा, द्राक्षे, सफरचंद इत्यादी फळे खावीत.
दही:गरोदर महिलांसाठी दह्याचे सेवन आरोग्यदायी आणि मुलासाठीही फायदेशीर आहे. दह्यामध्ये व्हिटॅमिन सीसह भरपूर प्रथिने असतात. दररोज दह्याचे सेवन केल्याने प्रसूतीनंतर निरोगी आणि विकसित बाळाचा जन्म होतो.
दूध: आपण नेहमी पाहतो की डॉक्टर लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकाला दूध सेवन करण्याचा सल्ला देत असतात. एक ग्लास दूध पोषक तत्वांनी भरलेले असते यामुळे शरीराला ताकद मिळते. दुधाने बाळाचा योग्य प्रकारे शारीरिक विकास होण्यास मदत होते.