Prepaid Reaches Plan : ग्राहकांची मजा! वर्षभर मिळवा अनलिमिटेड कॉल आणि डेटा, किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी

Prepaid Reaches Plan : रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या दोन्ही कंपन्यांकडे जास्त ग्राहक आणि शानदार प्लॅन आहेत. कंपन्या सतत वेगवेगळे प्लॅन ऑफर करत असतात.

सध्या दोन्ही कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी रिचार्ज प्लॅन आणला आहे. ज्याची 365 दिवसांची वैधता असून किंमत 5 रुपयांपेक्षाही कमी आहे. यामध्ये अमर्यादित कॉल,इंटरनेट आणि 3600 एसएमएस देखील उपलब्ध करून दिले आहेत.

रिलायन्स जिओचा 1559 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

रिलायन्स जिओचा 1559 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येत आहे. जर या प्लॅनची किंमत आणि वैधता पाहिली तर, कंपनीच्या या प्लॅनची ​​दैनिक किंमत 5 रुपयांपेक्षाही खूप कमी आहे. Airtel प्रमाणेच हा प्लॅन देखील 24GB बल्क 4G डेटा ऑफर करत आहे.

शिवाय कंपनीच्या ग्राहकांना डेटा कोटा संपल्यानंतर 64 Kbps च्या वेगाने इंटरनेट वापरणे सुरू ठेवता येईल. कंपनीच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलसह एकूण 3600 एसएमएस देखील उपलब्ध करून दिले आहेत. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की पात्र ग्राहकांना 5G अनलिमिटेड डेटाचा लाभ घेता येईल. तसेच अतिरिक्त फायदे म्हणून, कंपनीकडून Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud मध्ये प्रवेश मिळतो.

एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन प्रीपेड प्लॅन

हे लक्षात घ्या की एअरटेलचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे, यात 365 दिवसांची वैधता मिळत असून प्लॅनची किंमत 1799 रुपये आहे. समजा आपण किंमत आणि वैधता पाहिली तर, प्लॅनची ​​दैनिक किंमत 5 रुपयांपेक्षाही खूपच कमी आहे. या प्लॅनमध्ये देखील कंपनीच्या ग्राहकांना 24GB बल्क डेटा मिळतो.

समजा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही संपूर्ण डेटा एका दिवसातही संपवता येतो. शिवाय बल्क डेटा व्यतिरिक्त, प्लॅन अनलिमिटेड कॉलिंग आणि एकूण 3600 एसएमएस ऑफर करतो. प्लॅनमधील अतिरिक्त फायद्यां बद्दल बोलायचे झाले तर Apollo 24/7 Circle मध्ये प्रवेश, मोफत Wynk Music आणि 3 महिन्यांसाठी मोफत HelloTunes यांचा समावेश करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts