Maharashtra news : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुणतांबा येथे आज झालेल्या विशेष ग्रामसभेत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे १६ ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
यावर विचार करण्यासाठी राज्य सरकारला एक जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अन्यथा एक ते पाच जून या काळात गावात ठिय्या आंदोलन करण्याचा आणि त्यानंतरही विचार न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सरपंच डॉ. धनंजय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा झाली.
- ऊस पिकाला एकरी १ हजार रूपये अनुदान द्यावे
- शिल्लक ऊस पिकाला हेक्टरी दोन लाख रूपये द्यावे
- कांद्यासह सर्व पिकांना हमीभाव द्यावा
- कांद्याला प्रती क्विंटल पाचशे रूपये अनुदान द्यावे
- शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज मिळावी
- थकित वीजबिल माफ झाले पाहिजे
- कांदा आणि गव्हाची निर्यातबंदी उठवावी
- सर्व पिकांना आधारभूत किंमत दिली जावी, त्यासाठी आयोगाची स्थापना करून निर्णय घ्यावा
- २०१७ साली केलेल्या कर्जमाफीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी
- नियमित कर्ज भरणारांचे अनुदान दिले जावे
- दुधाला उसाप्रमाणे एआरपी लागू केला जावा
- दुधाला कमीतकमी ४० रूपये दर दिला जावा
- खाजगी दूध संकलन केंद्रात होणारी लूट थांबवावी
- वन्य प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास भरपाई दिली जावी
- शेतकरी आंदोलनात दाखल गुन्हे मागे घेतले जावे
हे ठराव त्यामध्ये करण्यात आले.