ताज्या बातम्या

PM Kisan Yojana : शेतीसाठी अवजारे खरेदीस मदत झाली, शेती करणे सुलभ झाले – लाभार्थ्यांच्या भावना

Government scheme : “पंतप्रधान क‍िसान सन्मान न‍िधी योजनेच्या माध्यमातून म‍िळालेल्या शासकीय मदतीमुळे शेतीकामासाठी लागणारे अवजारे, ब‍ियाणे, खते अशा शेती उपयोगी वस्तूंची खरेदी करता आली.

यामुळे शेती करणे ज‍िकीरीची न ठरता सुलभ झाले.” अशा शब्दात पंतप्रधान क‍िसान सन्मान योजनेच्या राहाता तालुक्यातील लाभार्थ्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

१ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान क‍िसान सन्मान न‍िधी योजनेची सुरूवात करण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी राज्य शासनाच्या शासकीय यंत्रणेमार्फत केली जाते.

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर चार मह‍िन्यांनी २ हजार असे वर्षाला ६ हजार रूपयांची आर्थ‍िक मदत थेट व‍ितरित केली जाते. या योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना ३१ मार्च २०१९ रोजी थेट बँके (DBT) च्या माध्यमातून पह‍िला हप्ता देण्यात आला.

आतापर्यंत या योजनेत शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात १० हप्ते जमा करण्यात आले आहेत. तर पुढील ११ वा हप्ता ३१ मे २०२२ रोजी व‍ितर‍ित केला जाणार आहे.
पंतप्रधान क‍िसान सन्मान योजनेच्या माध्यमातून अहमदनगर ज‍िल्ह्यातील राहाता तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना १० हप्त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी २० हजार रूपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

या योजनेत म‍िळालेल्या मदतीव‍िषयी राजुरी येथील शेतकरी योगेश दामोदर गोरे यांनी सांग‍ितले की, “मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. सध्या मी बीएसस्सीच्या पह‍िल्या वर्षात श‍िक्षण घेत आहे.

श‍िक्षणासोबत शेती ही करतो. पीएम किसान योजनेमुळे माझ्या कुटूंबाला मोठया प्रमाणात फायदा झालेला आहे. ऑनलाईन बियाणे खरेदी करतांना खात्‍यावर रक्‍कम शिल्‍लक नव्‍हती नेमक्या त्‍यावेळी योजनेचा पहिला हप्‍ता प्राप्‍त झाल्‍याने ब‍ियाणे खरेदी करणे शक्‍य झाले. “

बाभळेश्वर खुर्द येथील शेतकरी व‍िजयकुमार तान्हाजीराव बेंद्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “पंतप्रधान सन्मान न‍िधी योजना शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे आधाराची काठीच आहे. यामाध्यमातून म‍िळणाऱ्या मदतीमुळे कौटूंब‍िक गरजांसाठी व वैद्यकीय खर्चासाठी उपयोग झाला. शासनाने ही योजना पुढेही न‍ियम‍ितपणे सुरू ठेवावी.”

बाभळेश्वर बुद्रुक येथील शेतकरी म‍िनानाथ भाऊसाहेब म्हस्के यांनी सांग‍ितले की, “पंतप्रधान सन्मान योजनेच्या माध्यमातून म‍िळालेला न‍िधीचा न‍िश्च‍ितच शेतकऱ्यांसाठी आधार ठरतो. मला ही या न‍िधीच्या माध्यमातून बी-ब‍ियाणे, खरीपातील फवारणीसाठी औषधे खरेदी व ट्रॅक्टरसाठी ड‍िझेल खरेदीसाठी मदत झाली. “

पंतप्रधान क‍िसान सन्मान न‍िधी योजनेच्या अध‍िक माह‍िती व या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी https://pmkisan.gov.in/ यासंकेतस्थळाला भेट द्यावी. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts