Railway Recruitment 2022 : दहावी पास असणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वे (Indian Railway) मध्ये नोकरीसाठी सुवर्णसंधी (Golden Chance) आहे. रेल्वेने 1664 रिक्त जागांसाठी अर्ज (Application) मागवले आहेत.
यासाठीचं नोटिफिकेशन (Notification) जारी करण्यात आले असून अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (Website) भेट द्यावी.
RRC Recruitment 2022 : विहित पात्रता
अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. 01 ऑगस्ट 2022 रोजी वयाची गणना केली जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
याशिवाय, उमेदवार किमान 50% गुणांसह 10वी किंवा त्याच्या समकक्ष उत्तीर्ण असावा. उमेदवाराकडे भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त NCVT/SCVT द्वारे जारी केलेल्या संबंधित ट्रेडमध्ये ITI पास देखील असावा.
रेल्वे भरती 2022 : याप्रमाणे अर्ज करा
स्टेप 1: अधिकृत वेबसाइट rrcpryj.org ला भेट द्या.
स्टेप 2: मुख्यपृष्ठावर प्रदर्शित ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: तुम्हाला नवीन लॉगिन/नोंदणी पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.
स्टेप 4: तुमचे तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा आणि लॉगिन क्रेडेन्शियल तयार करा.
स्टेप 5: आता लॉगिन करा आणि सर्व स्कॅन केलेले दस्तऐवज अपलोड करा.
स्टेप 6: फी भरा आणि अंतिम सबमिट करा.
या मोहिमेअंतर्गत भारतीय रेल्वे 1664 रिक्त पदांची भरती करणार आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या कार्यक्षेत्रातील विविध विभाग, कार्यशाळा यांच्या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवार प्रयागराज, आग्रा, झाशीच्या कार्यशाळेत काम करतील. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचनेत सर्व आवश्यक माहिती तपासली पाहिजे.