ताज्या बातम्या

Railway Recruitment 2022 : रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी अर्ज करण्याची संधी…! परीक्षेशिवाय होणार थेट भरती

Railway Recruitment 2022 : क्रीडा कोट्याद्वारे 21 रिक्त पदांसाठी रेल्वे भरती 2022 अधिसूचित (notified) करण्यात आली आहे. रेल्वे थेट भर्ती अधिसूचना 2022 अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

भरती चाचणी आणि क्रीडा कामगिरीचे मूल्यमापन, शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) या आधारे केली जाईल आणि कोणतीही वेगळी परीक्षा घेतली जाणार नाही.

अर्ज (Application) प्रक्रिया सुरू झाली आहे आणि रेल्वे भरती 2022 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date) 4 ऑक्टोबर 2022 आहे. या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 92300 रुपये प्रति महिना पगार मिळेल.

इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वे नोकऱ्या 2022 साठी निर्धारित कालावधीत अर्ज करू शकतात. उमेदवार खाली दिलेल्या वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर तपशीलांसह आवश्यक भरती तपशील तपासू शकतात.

अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावे म्हणजेच उमेदवारांचा (candidates) जन्म 2 जानेवारी 1998 पूर्वी झालेला नसावा आणि 1 जानेवारी 2005 नंतर झालेला नसावा. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की उच्च वयोमर्यादेत कोणतीही सूट देण्याची तरतूद नाही, कारण पदांसाठी कोणतेही आरक्षण धोरण लागू नाही.

निवड प्रक्रिया

रेल्वे थेट भरती प्रक्रिया विविध निवड टप्प्यांतून केली जाईल ज्यात क्रीडा उपलब्धी, शैक्षणिक पात्रता चाचणी आणि मूल्यमापन यांचा समावेश आहे.

उमेदवारांची चाचणी समितीद्वारे त्यांची क्रीडा कामगिरी आणि रेल्वे संघ तसेच भारतीय रेल्वे संघासाठी योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी चाचणी केली जाईल. चाचणीच्या आधारावर उमेदवारांना ‘FIT’ किंवा ‘UNFIT’ म्हणून घोषित केले जाईल.

[web_stories title=”true” excerpt=”false” author=”false” date=”false” archive_link=”true” archive_link_label=”” circle_size=”150″ sharp_corners=”false” image_alignment=”left” number_of_columns=”1″ number_of_stories=”3″ order=”DESC” orderby=”post_title” view=”circles” /]

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts