ताज्या बातम्या

झेडपी गट-गण प्रारूप प्रभाग रचनेविरुद्ध हरकतींचा पाऊस..! आतापर्यंत इतक्या हरकती दाखल

Maharashtra news : जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारुप प्रभाग रचना प्रसिध्द झाली असून त्यासंदर्भात हरकती नोंदविण्याचे काम सुरु आहे.

मंगळवारी दिवसभरात या प्रारुप प्रभाग रचनेच्या विरुध्द १७ जणांनी लेखी स्वरुपात हरकती दाखल केल्या. मंगळवारपर्यंत दाखल झालेल्या एकुण हरकतींची संख्या २३ झाली आहे. आज बुधवार दि.८ जून हा हरकती दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार या हरकती नोंदवून घेतल्या जात आहेत. दिवसभरात प्राप्त होणाऱ्या हरकतींचा अहवाल त्याच दिवशी नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात सादर केला जात आहे.

मंगळवारी दिवसभरात एकूण १७ जणांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारुप प्रभाग रचना विरुद्ध हरकती दाखल केल्या. या हरकतदारात पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, रामदास भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल खेडकर, नितीन औताडे, आझाद ठुबे आदींसह सुधीर वैरागर, विष्षू काकडे, कचरू भालदंड , मधुकर गागरे, लहानू सदगीर, सुरेश खोसे, संदीप ठोंबरे , ॲड. सादिक शिलेदर, हनुमंत उतेकर, ॲड. सुभाष जायभाय यांनी हरकती दाखल केल्या आहेत.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts