ताज्या बातम्या

Agriculture news :देशी गाई पाळा आणि शेणा पासून करा ‘या’ पर्यावरण पुरक व्यवसायाची सुरुवात; मिळवा लाखो रुपये

अहमदनगर Live24 टीम, 05 एप्रिल 2022 Agriculture news :- भारतात देशी गाईला तर पवित्र मानलेच जाते. पण तिचे शेण, दूध व गोमूत्राचे खूप महत्त्व वेदांमध्ये देखील सांगितले आहे. देशी गाई पासून मिळणारे दूध उत्पन्न जरी कमी असले तरी तिचे शेण व गोमूत्र खूप फायदेशीर असते.

देशी गाईपासून मिळणारा कोणताच पदार्थ वाया जात नाही. आपणास गाईचे शेण हा पदार्थ जरी टाकाऊ वाटत असला तरी त्यापासून ३३ प्रकारची अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे उपयुक्त जिवाणू शेण व गोमूत्राच्या माध्यमातून जमिनीला मिळत असतात.

देशी गाईच्या शेणाचा वापर आपण शेतीसाठी कंपोस्ट खत, गांडूळखत, गोबर गॅस तयार करण्यासाठी आपण करू शकतो. तर एवढेच नव्हे आपण शेणापासून पर्यावरण पूरक विविध पदार्थ बनवून चांगला आर्थिक नफा देखील मिळवू शकतो.

आपण शेणापासून गोवऱ्या बरोबरच आता भांडी घासण्याची पावडर,मच्छर अगरबत्ती, धूपकांडी, कुंड्या,चपला इत्यादी बनवू शकतो. पण आता शेणा पासून घरोघरी लागणाऱ्या ईकोदीप (पणती) निर्मिती सुद्धा करता येणार आहे.

त्यासाठी धेनू टेक सोलुशन्स प्रा.लि या नामांकित कंपनीने मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी असणाऱ्या शेणाच्या पणती निर्मिती या सूक्ष्म व्यवसायाचे एक यशस्वी मॉडेल बनवले आहे.

मशीनची खास वैशिष्ट्ये

आकाराने लहान व वजनाने हलकी,कमीत कमी देखभाल खर्च,वापरण्यास अगदी सुलभ व सोपी,विजेची गरज भासत नाही,साच्या बदलण्यासाठी सोयीस्कर,सहज हातातून नेता येण्याजोगी.

दिपकार मशीनची उत्पादने

एका तासामध्ये १०० ते १२० पणत्या बनतात,एका वेळी २ पणत्या सहज बनवता येतात.एक किलो शेणाच्या पावडर पासून १८० ते २०० पणत्या सहज तयार करता येतात.

इको फ्रेंडली दिप म्हणजे शेणापासून ईकोदीप पणती बनवणे या यंत्राच्या साह्याने ग्रामीण भागातील शेतकरी किंवा महिला बचत गट यांच्या सहभागातून महिलांना या यंत्राचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रशिक्षण दिल्यानंतर यासाठी लागणारी मशीनरी, कच्चा माल, पॅकेजिंग मटेरियल, डिझाईनिंग व मार्केटिंग सपोर्ट धेनू कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे, कोल्हापूर, रायगड, अहमदनगर, पंढरपूर, उस्मानाबाद, या ठिकाणी यशस्वीरीत्या काम चालू आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चांगला नफा मिळत आहे.

पर्यावरण पूरक ईकोदीपचे फायदे

ईकोदीप हा मजबूत व टिकावू आहे, ईकोदीप हा वजनाने हलका असल्याने पाण्यावरही तरंगतो,
ईकोदीप हा पर्यावरणपूरक व प्रदूषण विरहित उत्पादन आहे,ईकोदीपचा वापर झाल्यानंतर तुळशीला किंवा कुंड्यांना खत म्हणूनही वापर करता येतो

ईकोदीपचा वापर दिवाळी, दसरा, होळी, गुडीपाडवा वाढदिवस, व लग्न समारंभासाठी करता येतो, ईकोदीपच्या पॅकिंगचा वापर मंदिरात नैवेद्य ठेवण्यासाठी करता येतो,ईकोदीप जाळल्याने कीटक व डासांचा नायनाट होतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts