अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक सुरु असतानाच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर जयंत पाटील स्वत: बैठकीतून चालत बाहेर पडले आणि रुग्णालयात जाण्यासाठी रवाना झाले. त्यानंतर बैठकीत खळबळ उडाली.
मात्र त्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करत त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. जयंत पाटील स्वत: बैठकीतून चालत बाहेर पडले आणि रुग्णालयात जाण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर बैठकीत खळबळ उडाली होती. जयंत पाटलांनी ट्विट करत आपली प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं होतं.
तर अफवांवर विश्वास ठेऊ नका असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.जयंत पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यांचे सर्व रिपोर्ट नाॅर्मल आले आहेत. मात्र, त्यांच्या इसीजी रिपोर्टमध्ये काही फरक जाणवल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.
२ डी इको आणि त्यांची बल्ड टेस्ट देखील नाॅर्मल आहे. मात्र, त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, जयंत पाटील हे रक्तदाबाने आधीपासूनच पीडित आहेत. यापूर्वी त्यांची एका वाहिनीत किरकोळ ब्लॉक आढळून आला होता. सध्याही एका वाहिनीत किरकोळ ब्लाॅकेज असल्यानं शस्त्रक्रियेचा निर्णय डाॅक्टर घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.