Raksha Bandhan 2022 : जगात भावा-बहिणीचे नाते हे सर्वात सुंदर आणि प्रेमळ नाते आहे. म्हणूनच त्यांचे नाते अनमोल (Priceless) मानले जाते.
बॉलिवूडमध्येही (Bollywood) काही बहीण भावाच्या जोड्या प्रसिद्ध आहे. ते केवळ बहीण भाऊ नसून ते एकमेकांचे चांगले मित्रही (Good friend) आहेत.
सारा आणि इब्राहिम अली खान
या भाऊ-बहिणीची (Sarah and Ibrahim Ali Khan) जोडीही खूप चर्चेत आहे. सारा अनेकदा इब्राहिमसोबत सुट्टी साजरी करण्यासाठी जाते. दोन्ही भावंडे सोशल मीडियावर (Social media) एकमेकांची खेचत असतात.
रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर
रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर (Ranbir Kapoor and Riddhima Kapoor)ही जोडीही बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहे. रणबीरच्या लग्नात रिद्धिमा कपूरने जबरदस्त डान्स केला. ती अनेकदा तिच्या भावाच्या चित्रपटांचे प्रमोशन करतानाही दिसते.
टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ
टायगर श्रॉफ आणि कृष्णा श्रॉफ ही जोडी देखील बॉलिवूडची प्रसिद्ध भाऊ-बहीण जोडी आहे. टायगर बॉलीवूडच्या सर्व चित्रपटांमध्ये दिसला असला तरी कृष्णा लाइम लाईटपासून दूर राहतो. जरी कृष्णा त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे आणि टायगर श्रॉफ देखील नेहमी त्याच्या कामाची प्रशंसा करताना दिसतो.
सैफ आणि सोहा अली खान
सैफ अली खान आणि सोहा अली खान यांच्यात खूप चांगले बाँडिंग आहे. दोघांनी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोहा अनेकदा तिच्या भावासोबतचे फोटो शेअर करत असते.
अनुष्का शर्मा आणि कर्णेश अनुष्का शर्मा
अनुष्का शर्मा आणि तिचा भाऊ कर्णेश हे बॉलीवूडमधील शक्तिशाली जोडपे आहेत. या दोघांनी मिळून अनेक उत्कृष्ट चित्रपट केले आहेत. अनुष्का शर्माची स्वतःची प्रॉडक्शन कंपनी तिचा भाऊ कर्णेश शर्मा सांभाळतो.