Ram Mandir News : देशातील सर्वात मोठ्या राम मंदिरात आज प्रभू श्री रामच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. अयोध्यामध्ये प्रभू श्री रामाचे सर्वात मोठे राम मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात तीन माजले तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक मजल्यामध्ये वेगवेगळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
राम मंदिराच्या तळमजल्याची सर्व माहिती
राम मंदिरामध्ये एक गर्भगृह देखील बांधण्यात आले आहे. या ठिकाणी प्रभू श्री रामाचे बालस्वरूप म्हणजेच राम वास्तव करतील. मंदिराची लांबी (पूर्व ते पश्चिम) 380 फूट, रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट असेल.
राम मंदिराच्या तळमजल्यावर 160 खांब बनवण्यात आले आहे. या 160 खांबावर मंदिराचे पूर्ण छत बनवण्यात आले आहे. मंदिराच्या तळमजल्यात गर्भगृहासह 5 मंडप बनवण्यात आले आहे. नृत्य मंडप, रंग मंडप, गुढ मंडप (सभा मंडप), प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे हे मंडप बनवण्यात आले आहेत.
ट्रस्टच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार तळमजल्यावर प्रामुख्याने 12 दरवाजे बनवण्यात आले आहेत. तर एकूण दरवाजांची संख्या 44 असणार आहे. अपंग आणि वृद्धांना मंदिरात चढण्यासाठी रॅम्प आणि लिफ्टची सुविधा तयार करण्यात आली आहे.
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर काय होणार
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर 132 खांब तयार करण्यात आले आहेत. तळमजल्यापेक्षा पहिल्या मजल्यावर कमी खांब आहेत. पहिल्या मजल्यावर श्री राम यांचा दरबार असेल. या ठिकाणी रामाची मूर्ती असेल जी सिंहासनावर विराजमान असेल. या ठिकाणी माता जानकी, भाऊ लक्ष्मण आणि वीर हनुमानही असतील. तसेच राम मंदिरासोबत इतर मंदिरे देखील या ठिकाणी पाहायला मिळतील.
राम मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर काय होणार?
रामजन्मभूमी ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराचे तीन टप्प्यात काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होताच दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. भाविकांना मंदिरच्या तिसऱ्या मजल्यावर जाता येणार नाही.
दुसऱ्या मजल्यावर पहिल्या मजल्यापेक्षा 74 खांब बांधले जाणार आहेत. या मजल्यावर सर्वात मोठे शिखर बांधण्यात येणार आहे. सध्या मंदिराला लाकडी रचनेच्या साहाय्याने स्वरूप देण्यात आले आहे.