Ration Card News : रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. हा असा दस्तऐवज आहे ज्यामुळे देशातील गरिबांना स्वस्त दरात धान्य शासनाकडून दिले जाते. रेशन कार्ड धारक व्यक्तींना तीन रुपयात तांदूळ आणि दोन रुपयात गहू तसेच इतर भरडधान्य एक रुपये प्रति किलो या दरात उपलब्ध करून दिले जातात.
विशेष म्हणजे ज्या व्यक्तींकडे अंत्योदय रेशन कार्ड असते त्यांना शासनाकडून साखर देखील उपलब्ध करून दिली जाते. रेशन कार्ड चा उपयोग केवळ धान्य मिळवण्यासाठी होतो असे नाही तर रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. याचा उपयोग वेगवेगळ्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी देखील होतो.
हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेटसाठी ‘या’ तारखेपर्यंत विशेष मोहीम; लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन
रेशन कार्डचा वापर हा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी होतो. तसेच शेतमजुरांना, महिलांना, विद्यार्थ्यांसाठीही रेशन कार्ड अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचा पुरावा आहे. विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनात रेशन कार्ड वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगी पडत असते. अगदी शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी देखील हे दस्तऐवज महत्त्वाची भूमिका निभावते. अशा परिस्थितीत आज आपण नव्याने रेशन कार्ड बनवण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज भरावां लागतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्रात नवीन शिधापत्रिका काढण्यासाठी नमुना नंबर एक नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज हा फॉर्म भरावां लागतो. हा अर्ज आपण अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करू शकणारा आहात. तसेच आम्ही आपल्या सोयीसाठी हा अर्ज पीडीएफ स्वरूपात देखील उपलब्ध करून देणार आहोत. या अर्जाची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी आपणास या बातमीच्या शेवटी लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे. दरम्यान आता आपण हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा याबाबत जाणून घेऊया.
हे पण वाचा :- रेल्वेचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांना रेल्वेच तिकीट मिळणार फ्री, ‘त्यां’च्या नातेवाईकांना पण मिळणार लाभ, पहा…..
हा अर्ज करण्यापूर्वी अर्जावर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे पासपोर्ट आकाराचे फोटो चिकटवावे लागतात. अर्जावर नमूद केलेल्या ठिकाणी हे पासपोर्ट आकाराचे फोटो चिपकवायचे आहेत.
यानंतर आपल्या गावाचे नाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव सांगितलेल्या ठिकाणी लिहायचे आहे.
यानंतर पहिल्या भागात म्हणजे 1 मध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे आहे. अर्जदार हा कुटुंबप्रमुख असतो. यामुळे कुटुंबप्रमुखाचे नाव त्या ठिकाणी लिहायचे आहे. तसेच नाव लिहिताना आडनावाने प्रथम सुरुवात करायची आहे. यानंतर अर्जदार व्यक्तीचे लिंग, नागरिकत्व (भारतीय), तसेच रहिवासी पत्ता त्या ठिकाणी नमूद करायचा आहे.
यानंतर दुसऱ्या भागात म्हणजे दोन मध्ये अर्जदार म्हणजेच कुटुंबप्रमुख आणि कुटुंबातील सदस्यांची नावे लिहायची आहेत. यासाठी अर्जामध्ये कॉलम राहील या कॉलम मध्ये अर्जदार आणि अर्जदाराच्या कुटुंबात असलेल्या सदस्यांची नावे आणि कुटुंबप्रमुखाशी असलेले त्यांचे नाते त्या ठिकाणी लिहायचे आहे. या कॉलममध्ये कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातील सदस्यांची जन्मदिनांक, मोबाईल क्रमांक, व्यवसाय, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती संबंधित रकान्यात भरावी लागणार आहे.
यानंतर अर्जाच्या तिसऱ्या भागात म्हणजेच तीन मध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींचे उत्पन्न, कुटूंबात कोणी दिव्यांग आहे का, कुटुंबातील सदस्य गंभीर आजाराने ग्रस्त आहे का, मनरेगा नोंदणी केलेली आहे का, स्वयंपाकी गॅस आहे का यांसारखी माहिती भरायची आहे.
यानंतर अर्जाच्या सहाव्या भागात म्हणजे सहा मध्ये घोषणापत्र भरायचे आहे.
यानंतर मग अर्जदार व्यक्तीला आपली स्वाक्षरी करायची आहे किंवा अंगठा द्यायचा आहे. तसेच अर्जावर दिनांक नमूद करायची आहे.
हा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी महाराष्ट्र शिधापत्रिका अर्जनमुना या लिंक वर क्लिक करा.