Ration Card : सध्याच्या काळात सगळीकडे रेशन कार्डची गरज (Ration card requirement) भासते. अशातच जर तुमचे रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर मोठ्या समस्येला (Problem) तोंड द्यावे लागते.
रेशन कार्डमुळे तुम्हाला स्वस्तात धान्य (Cheap grain) मिळू शकते. त्याचबरोबर इतर योजनांचाही (Scheme) फायदा घेता येतो. जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या योजनांचा फायदा घेता येणार नाही.
रेशन कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे. प्रत्येक राज्यातील जनतेला ते असणे बंधनकारक आहे. याद्वारे लोकांना मोफत रेशन मिळू शकते. जर तुम्हाला अजून रेशन कार्ड बनवले नसेल तर लगेच तुम्ही ते बनवू शकता. प्रत्येक राज्यासाठी रेशन बनवण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते.
ही कार्डे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) द्वारे अनुदानित अन्नधान्य खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना प्रदान केली जातात. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारे रेशनकार्ड दिले जाते.
रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे:
अशाप्रकारे करा अर्ज
यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल जे 5 ते 45 रुपयांपर्यंत आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर फील्ड व्हेरिफिकेशनसाठी फॉर्म पाठवला जाईल. पडताळणी प्रक्रियेस 30 दिवस लागतात. पडताळणी योग्य असल्यास 30 दिवसांच्या आत रेशन कार्ड जारी केले जाते.