ताज्या बातम्या

Ration Card Update: पत्नी आणि मुलांचे नाव रेशन कार्डमधून गायब झाले असेल तर ‘या’ सोप्या पद्धतीने करा अपडेट

Ration Card Update: रेशन कार्डद्वारे (ration card) कोणत्याही कुटुंबाला सरकारकडून (government) मोफत रेशन (free ration) मिळते. या रेशन पॅकेजमध्ये मैदा, तांदूळ, डाळी, तेल यासह इतर खाद्यपदार्थ असू शकतात.

रेशनकार्ड हे असे एक दस्‍तऐवज आहे, जे तुम्‍हाला सरकारकडून मिळणा-या मोफत रेशनचा लाभ घेण्याची वैधता देते. आता इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे (family members) नाव रेशन कार्डमध्ये लिहिलेले नसेल तर आपण ते सहजपणे ऑनलाइन अपलोड करू शकता.

आम्ही तुम्हाला सांगतो की रेशन कार्ड एक प्रकारे पत्ता आणि ओळखपत्र म्हणूनही काम करते, त्यामुळे येथे कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असणे आवश्यक आहे. जर तुमच्या घरातील तुमच्या पत्नीचे (wife) किंवा मुलाचे (child) नाव रेशन कार्डमध्ये नोंदवलेले नसेल, तर तुम्ही त्याची सोपी प्रक्रिया जाणून घेऊ शकता. पण रेशनकार्डमध्ये नाव अपडेट करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे (documents) आवश्यक आहेत ते आधी जाणून घ्या.

या कागदपत्रांची आवश्यकता असू शकते

मुलाचे नाव जोडायचे असेल, तर कुटुंबप्रमुखाकडे रेशन कार्ड असणे आवश्यक आहे.  कुटुंब प्रमुखाकडे मूळ प्रत सोबत फोटो कॉपी असावी याशिवाय मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि त्यांच्या पालकांचे आधार कार्ड आवश्यक असेल. नवविवाहित महिलेचे नाव जोडायचे असल्यास तिचे आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र आणि पालकांचे रेशन कार्ड आवश्यक आहे.

घरबसल्या सहज नाव अपडेट करता येते

सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठ्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा

नाव अपडेट करण्यासाठी, प्रथम तुमचा आयडी तयार करा

यानंतर Add New Member चा पर्याय उपलब्ध होईल. त्यावर क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल आता तुम्ही तुमचे कुटुंब तपशील येथे अपडेट करू शकता

फॉर्मसह दस्तऐवजाची सॉफ्ट कॉपी अपलोड करा

फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल याशिवाय पोर्टलवरून फॉर्मला ट्रक देखील करता येईल.

त्यानंतर कागदपत्रे आणि फॉर्मची पडताळणी होणार .

फॉर्म स्वीकारल्यानंतर रेशन कार्ड पोस्टाद्वारे तुमच्या घरी येईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts