Ration card : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत एकूण 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून 2020 ते सप्टेंबर 2022 पर्यंत ही योजना लागू करण्यात आली होती. करोडो लोकांनी याचा फायदा घेतला आहे. साहजिकच रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची सर्व माहिती असते.
जसे की नाव, वय, पत्ता इत्यादी. अनेकदा घरात मूल जन्माला आल्यानंतर किंवा कुटुंबात नवीन सदस्य आल्यानंतर लोकांच्या नवीन सदस्याचे नाव जोडणे अनिवार्य असते. तुम्ही आता घरबसल्या रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव जोडू शकता. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत.
गरजेची आहेत ही कागदपत्रे
नवजात मुलाचे नाव जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- मूळ रेशन कार्ड
- मुलाचे जन्म प्रमाणपत्र
- पालकांचा आयडी पुरावा
- कुटुंबात वधूचे नाव जोडण्यासाठी दस्तऐवज
- विवाह प्रमाणपत्र
- पतीचे मूळ रेशन कार्ड
- पालकांच्या रेशनकार्डमधून नाव वगळल्याचे प्रमाणपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
असे जोडा ऑनलाइन नाव
- यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर, तुमच्या राज्याच्या अन्न आणि पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- यानंतर तुमच्यासमोर वेबसाइटचे होम पेज उघडेल.
- समजा तुम्ही या पोर्टलवर अगोदरच नोंदणीकृत असल्यास तुम्हाला लॉग-इन आयडी आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे.
- आता तुमच्यासमोर कुटुंबातील सदस्यांचे नाव जोडण्याचा पर्याय दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.
- क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल, त्यात आवश्यक ती सर्व माहिती भरा.
- रेशन कार्डमध्ये नवीन नाव जोडण्यासाठी तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, निवासी प्रमाणपत्र किंवा विवाह निमंत्रण पत्रिका गरजेची असणार आहे.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वेबसाईटवर कागदपत्रांची संपूर्ण यादी दिली असून तिथून तुम्ही तुमची कागदपत्रे अपलोड करू शकता.
- त्यानंतर तुम्ही सबमिट क्लिक करून अर्ज पाठवू शकता.
- तुम्हाला एक पावती क्रमांक मिळेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता.
- यानंतर 1 महिन्यानंतर तुमचे रेशन कार्ड पोस्टाने घरी येईल.