ताज्या बातम्या

Old Coin Alert :  तुम्हीही जुनी नाणी विकत असाल तर सावधान.. ; ‘त्या’ प्रकरणात RBI ने दिला मोठा इशारा

Old Coin Alert :  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जुन्या नाणी (old coins)आणि नोटांच्या (notes) खरेदी (purchase) आणि विक्रीबाबत (sale) लोकांसाठी एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.

त्यात चेतावणी देण्यात आली आहे की काही फसवे घटक ऑनलाइन (online) , ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर (offline platforms) जुन्या नोटा आणि नाणी विकण्यासाठी सेंट्रल बँकेचे (central bank) नाव आणि लोगो वापरत आहेत. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून जुन्या नाणी आणि नोटांच्या (Unique Rear Coins

) खरेदी-विक्रीबाबत अनेक बातम्या येत आहेत. त्यामुळे आरबीआयने हा अलर्ट जारी केला आहे.

RBI ने ट्विट करून लोकांना इशारा दिला आहे
रिझव्‍‌र्ह बँकेने ट्विट केले की, हे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे कि काही घटक चुकीच्या पद्धतीने RBI आणि विविध ऑनलाइन लोकांची नावे वापरत आहेत. जुन्या नोटा विकण्यासाठी लोकांना फी ,कमिशन किंवा कर मागत आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की अशा कोणत्याही कृतीत आपला सहभाग नाही आणि अशा व्यवहारांसाठी  कोणाकडूनही फी किंवा कमिशन कधीही मागणार नाही. तसेच बँकेने म्हटले आहे कि त्यांनी कोणत्याही संस्थेला किंवा व्यक्तीला अशा कामांसाठी कोणत्याही प्रकारचे अधिकार दिलेले नाहीत.

आरबीआयचा कोणाशीही करार नाही
भारतीय रिझर्व्ह बँक अशा प्रकरणांमध्ये कोणतीही कारवाई करत नाही. तसेच तो कधी कोणाकडून अशी फी किंवा कमिशन मागत नाही.  रिझर्व्ह बँकेने अशा व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेकडून कोणतेही शुल्क किंवा कमिशन आकारण्याचा कोणताही अधिकार कोणत्याही संस्था, कंपनी किंवा व्यक्ती इत्यादींना दिलेला नाही.

अशा फसवणूक आणि फसव्या ऑफर्सला बळी पडू नये असा सल्ला आरबीआयने सर्वसामान्य जनतेला दिला आहे. 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts