RBI Rule : एका व्यक्तीला किती बँक खाती उघडता येतात? जाणून घ्या महत्त्वाचा नियम,अन्यथा…

RBI Rule : सध्याच्या काळात जवळपास सर्वांकडे बँक खाते आहे. कोणताही व्यवहार करायचा असेल तर त्या व्यक्तीला बँक खाते गरजेचे असते. प्रत्येक बँकेचे व्याजदर वेगवेगळे व्याजदर असते. देशात सरकारी तसेच खासगी बँका आहेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँक खाते चालू करू शकता.

बँक आपल्या ग्राहकांसाठी सतत नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. अनेकांचे एकापेक्षा जास्त बँकेत खाते असते. परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार एका व्यक्तीला किती बँक खाती चालू करता येतात, हे अनेकांना माहिती नसते.

असे काही जण आहेत ज्यांची दोनपेक्षा जास्त बँक खाती असतात. अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो का की एखाद्या व्यक्तीची किती बँक खाती असू शकतात? किंवा ती बँक खाती चालू करण्याबाबत RBI च्या नियमांमध्ये काय सांगण्यात आले आहे? दरम्यान, आरबीआयचे याबाबत काही नियम आहेत.

किती प्रकारची बँक खाती असतात?

  • बचत खाते
  • चालू खाते
  • पगार खाते (शून्य शिल्लक खाते)
  • पगार खाते
  • संयुक्त खाते (बचत आणि चालू)

कोणासाठी कोणते खाते असते?

समजा तुम्हाला तुमची दैनंदिन किंवा मासिक बचत करायची असल्यास तुम्ही यासाठी बचत खाते चालू करू शकता. बचत खाते हे देशातील सर्वात जास्त वापरले जाणारे प्राथमिक खाते असून बचत खात्यावर व्याज देण्यात येते.

विविध बँकांकडून विविध महिन्यांनुसार व्याजदरही देण्यात येते. तसेच लोक व्यवसायासाठी चालू खात्यांचा वापर करत असून काही लोक पगारासाठी केवळ पगार खाते वापरतात.

जाणून घ्या नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीची कितीही खाती असू शकतात त्यावर कोणतीही मर्यादा निश्चित केली नाही. परंतु तुम्ही चालू केलेल्या सर्व बँक खात्यांकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे, नाहीतर बँक तुमच्याकडून शुल्क आकारू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts