Reserve Bank Of India : जर तुम्ही बँकेत जाणार असाल तर त्याअगोदर ही बातमी वाचा. नाहीतर तुम्हाला खूप मोठा फटका बसू शकतो. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे बँकेत जाण्यापूर्वी ही सुट्ट्यांची यादी तपासून बँकेत जा.
अन्यथा तुमच्या महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. यादीनुसार या आठवड्यात सलग 3 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जरी बँकांना सुट्टी असली तरी तुम्ही ऑनलाइन व्यवहार करू शकता.
घेता येणार ऑनलाइन सुविधेचा लाभ
आपल्या ग्राहकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये म्हणून रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या सुट्ट्यांची यादी आधीच जारी केली आहे. आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार, फेब्रुवारीमध्ये बँका 10 दिवस बंद राहणार आहे, तरीही तुम्ही ऑनलाइन व्यवहार करू शकता.
कोणत्या दिवशी बंद असणार बँका
15 फेब्रुवारी 2023 – Lui-Ngai-Ni मुळे इंफाळ बँका बंद राहणार आहेत.
18 फेब्रुवारी 2023 – अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, हैदराबाद, कानपूर, लखनौ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, तिरुवनंतपुरम येथे महाशिवरात्रीमुळे बँका बंद राहणार आहेत.
फेब्रुवारी 19, 2023 – रविवारमुळे संपूर्ण भारतातील बँका बंद राहणार आहेत.
20 फेब्रुवारी 2023 – आयझॉलमध्ये राज्य दिनानिमित्त बँका बंद राहणार आहेत.
फेब्रुवारी 21, 2023 – लोसारमुळे गंगटोकमध्ये बँका बंद राहणार आहेत.
25 फेब्रुवारी 2023 – चौथ्या शनिवारमुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
26 फेब्रुवारी 2023 – रविवारमुळे संपूर्ण भारतातील बँका बंद राहणार आहेत.
अशी पहा सुट्ट्यांची यादी
जर तुम्हाला बँक सुट्ट्यांबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर, त्यासाठी तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx. येथे तुम्हाला दर महिन्याला प्रत्येक राज्याच्या बँक सुट्ट्यांची माहिती जाणून घेऊ शकता.