RD Interest Rate : ‘या’ गुंतवणूकदारांना सरकारची मोठी भेट, दिवाळीपूर्वी व्याजात होणार वाढ? जाणून घ्या

RD Interest Rate : वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोणतीही जोखीम नाही आणि जास्त परतावा मिळत असल्याने अनेकजण सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकत करत असतात. प्रत्येक योजनेचे व्याजदर वेगळे असते.

प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणूक योजना असते. ज्याचा तुम्हीही लाभ घेऊ शकता. जर तुम्ही पोस्ट ऑफिस आणि बँकांद्वारे ऑफर करण्यात आलेल्या योजनेमध्ये गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार लवकरच व्याजात वाढ करणार आहे.

या गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा

आता केंद्र सरकारकडून आरडी खातेधारकांना दिवाळीनंतर लाभ दिला जाणार आहेत. ज्यांनी डिसेंबर तिमाहीसाठी 5 वर्षांची आरडी जमा केली असेल त्यांना सरकारकडून जास्त फायदे दिले जाणार आहेत. पोस्ट ऑफिस आरडीच्या गुंतवणूकदारांना जास्त व्याजाने लाभ मिळवता येईल.

मिळेल 6.7 टक्के व्याज

आता पोस्ट ऑफिस आरडीवर गुंतवणूकदारांना जास्त व्याजाचा लाभ मिळणार आहे. गुंतवणूकदारांना 5 वर्षांच्या आवर्ती ठेवीवर 6.7 टक्के व्याजाचा लाभ दिला जाईल. या लोकांना दीर्घ कालावधीसाठी करण्यात आलेल्या RD वर जास्त व्याजाचा लाभ मिळेल.

लहान बचत योजना

हे लक्षात घ्या की किसान विकास पत्र, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना यासारख्या लहान बचत योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल केला नाही.

असे आहेत ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीचे व्याजदर

  • PPF वर 7.1 टक्के टक्के व्याज
  • पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के व्याज
  • पोस्ट ऑफिस आरडीवर 6.7 टक्के व्याज
  • किसान विकास पत्रावर 7.5 टक्के व्याज
  • सुकन्या समृद्धी योजनेवर 8 टक्के व्याज
  • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावर 7.7 टक्के व्याज
  • ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8.2 टक्के व्याज
  • पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेवर 7.4 टक्के व्याज

हे लक्षात घ्या की केंद्र सरकार दर तीन महिन्यांनी व्याजदरांचे पुनरावलोकन करत असते. अशा परिस्थितीत व्याजात बदल करण्याची शक्यता आहे किंवा नाही. येत्या डिसेंबर महिन्यामध्ये आरडीचे व्याजदर वाढवले ​​जातील. त्यामुळे या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्याला त्याचा मोठा फायदा होईल.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts