ताज्या बातम्या

Realme 10 : मार्केटमध्ये धुमाकूळ घालायला येणार रियलमीचा शानदार स्मार्टफोन, ‘या’ दिवशी होणार लाँच

Realme 10: भारतात रियलमीचे वापरकर्ते (Realme users) खूप आहेत. ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनी (Realme) वेळोवेळी नवनवीन स्मार्टफोन (Realme smartphone) लाँच करत असते.

अशातच आता पुन्हा एकदा भारतीय बाजारात (Indian market) रियलमी शानदार स्मार्टफोन धुमाकूळ घालायला येत आहे. Realme 10 असे या स्मार्टफोनच्या (Realme 10 smartphone) सीरीजचे नाव आहे.

Realme 10 ची अपेक्षित किंमत

Realme 10 ब्लू आणि ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जाईल. मात्र, फोनच्या किंमतीबाबत (Realme 10 price) अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला सादर केलेल्या Realme 9 5G च्या किमतीत हा फोन सादर केला जाण्याची अपेक्षा आहे. हा फोन 15,999 रुपये किमतीत लॉन्च करण्यात आला होता. Realme 10 देखील 15,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर ऑफर केला जाऊ शकतो.

Realme 10 चे संभाव्य तपशील

अलीकडेच Realme 10 सीरीजचे एक पोस्टर समोर आले आहे, जे अगदी अधिकृत पोस्टरसारखे दिसते. पोस्टरमध्ये Realme 10 सीरीज फोनचा रंग आणि डिझाइनची (Realme 10 specifications) माहिती देखील देण्यात आली आहे.

लीक्सनुसार, MediaTek Helio G99 SoC प्रोसेसर Realme 10 मध्ये उपलब्ध असेल. त्याच वेळी, फोन 128 जीबी स्टोरेज क्षमतेसह 4 जीबी रॅमसह ऑफर केला जाऊ शकतो. तसेच, 6.4-इंचाच्या डिस्प्लेसह फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आढळू शकतो.

Realme 10 च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. फोनसोबत ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्ट असेल असाही दावा केला जात आहे.

त्याच वेळी, फोनमध्ये सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. Realme 10 मध्ये 5000 mAh बॅटरी आहे आणि USB Type-C पोर्टसह 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts