ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात विक्रमी उन्हाळी सोयाबीनचा पेरा, का झालं असं? वाचा सविस्तर……

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2022 Krushi news :- राज्यात मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात (Kharif season) सोयाबीनची पेरणी केली जाते. सोयाबीन (Soybean) हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक आहे.

याची पेरणी मराठवाडा आणि विदर्भ या दोन प्रांतात मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. या दोन्ही विभागात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे.

असे असले तरी, सध्या सोयाबीनची लागवड पश्चिम महाराष्ट्रापासून राज्यातील विविध विभागात बघायला मिळत आहे. यादरम्यान पुणे जिल्ह्यातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

पुणे जिल्ह्यात सोयाबीन पेरा दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे भविष्यात पुणे जिल्हा सोयाबीनचे आगार (Soybean Depot) बनतो की काय? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.

यावर्षी पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले गेले. आता पुन्हा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची पेरणी बघायला मिळत आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात जवळपास 1200 हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे.

त्यामुळे पुणे जिल्हा हळूहळू सोयाबीनचे आगार म्हणून ओळखले जाईल अशी आशा आहे. उन्हाळी हंगामात (Summer season) देखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी (Soybean sowing) झाली असल्याने, सोयाबीनचे चांगले उत्पादन प्राप्त होण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.

सुरुवातीला शेतकरी बांधवांनी (Farmers) जमिनीची सुपीकता वाढावी म्हणून सोयाबीन पेरणीस पसंती दर्शवली होती; पण सोयाबीनच्या पिकाने कमी-अधिक पावसात देखील खात्रीशीर उत्पादन दिल्याने शेतकरी बांधवांनी आता सोयाबीन पेरणी कडे आपला मोर्चा वळवला आहे.

यावर्षी मात्र, जिल्ह्यातील अनेक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे (Soybean growers) सोयाबीन अवकाळी पावसामुळे काढणीनंतर वावरात सडले. या दरम्यान कृषी विभागाने (Department of Agriculture) उन्हाळी हंगामात बीजोत्पादन (Seed production) करण्याच्या हेतूने जनजागृती करण्यास सुरुवात केली होती.

याला शेतकरी बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवला आणि फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाळी सोयाबीनची पेरणी होऊ लागली. पुणे जिल्ह्यात कृषी विभागाच्या या जनजागृतीस विशेष प्रोत्साहन मिळाले कारण की जिल्ह्यात जवळपास बाराशे हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकट्या बारामतीत जवळपास 556 हेक्‍टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीनची पेरणी झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. यापाठोपाठ उन्हाळी हंगामात जुन्नर तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी झाली आहे जुन्नर मध्ये जवळपास 240 हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी सोयाबीन पेरला गेला आहे.

याव्यतिरिक्त देखील इतर अनेक तालुक्यात उन्हाळी हंगामातील सोयाबीन पेरा समाधान कारक आहे. जिल्ह्यातील खेड, हवेली, मुळशी, भोर, मावळ, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, दौंड तालुक्यात उन्हाळी सोयाबीन पेरणी केल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts