इंधन दरवाढ अशी कमी करा ; नगर जिल्ह्यातील या आमदाराचा थेट पंतप्रधानांना सल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-देशात इंधनाच्या दारात सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे सर्वच महागले असून, या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरड मोडले आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्याची मागणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकराकडे सातत्याने करण्यात येत असताना आता  राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी मोदी सरकारला इंधन दर कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या काळात दरवाढीचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातच रोहित पवार यांनी ट्विट करून पेट्रोल-डिझेलचे दर कमी कसे करता येतील, याविषयी मोदी सरकारला सल्ला दिला.

इंधन दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी कमी करण्याचा केंद्र विचार करत आहे.मात्र एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो. सेसमध्ये मिळत नाही, म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल, ही अपेक्षा, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

त्यांनी हे ट्विट पंतप्रधान कार्यालय आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग केलं आहे.दरम्यान, केंद्र सरकार इंधनावरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. अर्थमंत्रालय त्यावर सकारात्मक विचार करत असून राज्ये, तेल कंपन्या आणि पेट्रोलियम मंत्रालयाशी चर्चा करत आहे.

त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीपासून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र नगर जिल्ह्यातील आमदाराने थेट पंतप्रधानांना ट्विट करून  सल्ला दिल्याने आता केंद्र याकडे कोणत्या दृष्टीने पाहते ते महत्वाचे आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts