Reliance Jio Recharge Plan : भारतातील खाजगी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनी ग्राहकांच्या बजेटनुसार प्लॅन ऑफर करत असल्याने कंपनी इतर कंपन्यांना कायम टक्कर देत असतात.
असाच रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट प्लॅन आणला आहे. यात ग्राहकांना दीर्घ वैधतेसह डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचा घेता येणार आहे. या रिचार्ज प्लॅनची वैधता एकूण 84 दिवसांची आहे. या प्लॅनची किंमतही कमी आहे. त्यामुळे जर तुम्ही कमी किमतीत रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर तुमच्यासाठी हा प्लॅन उत्तम आहे.
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला मेसेजिंगसाठी एकूण 1000 एसएमएस सुविधा देण्यात येत आहेत. तसेच, तुम्हाला यात Jio TV, Jio Cinema आणि इतर Jio अॅप्सचाही प्रवेश देण्यात येत आहे. इतकेच नाही तर या प्लॅनमध्ये उपलब्ध 6GB इंटरनेट डेटाची वैधता 84 दिवसांसाठी असणार आहे. इंटरनेट डेटा संपला की, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील प्लॅनवर डेटा अॅड रिचार्ज करता येईल.
किती आहे प्लॅनची किंमत?
कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 395 रुपये इतकी असून हा प्लॅन रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला यात एकूण 84 दिवसांची वैधता मिळत आहे. यात तुम्हाला एकूण 6GB इंटरनेट डेटा देण्यात येत आहे. हे लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये तुम्हाला दैनिक डेटा मर्यादेचा लाभ मिळत नाही.
कंपनीच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगचाही फायदा मिळत असून या प्लॅनमध्ये उपलब्ध 6GB इंटरनेट डेटाची वैधता 84 दिवसांसाठी असणार आहे. तसेच कंपनीच्या या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये, तुम्ही दीर्घ वैधतेसह डेटा आणि अमर्यादित कॉलिंगचा आनंद घेऊ शकता.