दिव्यांग सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा : ‘वर्क फ्रॉम होम’करण्यास परवानगी

अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-दिव्यांग सरकारी कर्मचारी, अधिकारी यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट देण्यात आली आहे.

त्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संबंधित विभागातर्फे केला जाणार आहे, असा महत्त्वाचा निर्णय धनंजय मुंडे यांच्या सामाजिक न्याय विभागाने घेतला आहे.

याबाबतची माहिती स्वतः सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून दिली आहे. देशासह राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

अशा परिस्थितीमध्ये. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध राज्यात घालण्यात आले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना ही केवळ पंधरा टक्के उपस्थिती निश्चित केली आहे.

मात्र आता सामाजिक न्याय विभागाने आणखी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तीचे आरोग्य आणि इतर सुविधांचा विचार करून त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

त्यासंबंधीच्या शासन आदेश देखील त्यांनी पोस्ट केला आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात सध्या सरकारी कार्यालयांना देखील मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत काम करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत.

त्यानुसार सरकारी कार्यालयांमध्ये रोटेशन पद्धतीनुसार सरकारी कर्मचारी काम करत आहेत. धनंजय मुंडे यांच्या निर्णयामुळे मात्र दिव्यांग व्यक्तींना दिलासा मिळणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts