AC Tips : सध्या कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी बाजारात फॅन, कुलर तसेच एअर कंडिशनर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागणी वाढल्यामुळे या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इतकेच नाही तर वापर जास्त असल्यामुळे महिन्याच्या वीजबिलात वाढ होत आहे.
त्यामुळे अनेकांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. परंतु, तुम्ही आता कमी वीजबिल येणारा एअर कंडिशनर खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या एअर कंडिशनरची किंमत खूपच कमी आहे. हा एअर कंडिशनर कोठून खरेदी करता येत आहे? त्यावर काय ऑफर मिळत आहे? जाणून घ्या.
जर तुम्ही बाजारातून किंवा ई-कॉमर्स वेबसाइटवरून एसी खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही फाइव्ह स्टार रेटिंग असलेला एसी खरेदी करू शकता.
जर तुम्ही फाइव्ह स्टार रेटिंगचा एसी वापरला तर तुमचे प्रत्येक महिन्याला वीज बिल कमी होईल. कारण फाईव्ह स्टार रेटिंग असणारा एसी फक्त थंडपणाच पटकन पसरवत नाही तर खूप कमी वीज वापरतो.
इतकेच नाही तर थ्री स्टार रेटिंग एसी 1 तासात सरासरी 1.1 युनिट वीज बिल वापरतो. तसेच 1.5 टन पंचतारांकित AC सुमारे 0.84 युनिट विजेचा वापर करतो.
तसेच तुम्हाला एसीमध्ये फाइव्ह स्टार रेटिंगसह अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळतात. जर तुम्हाला या कडक उन्हाळ्यात एसी चालवून वीज बिल वाचवायचे असतील तर तुम्ही फाइव्ह स्टार रेटिंग असणारा एसी खरेदी करू शकता.