ऑक्सिजनवर संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजन संपल्याने तडफडून मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :-देशात अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहेत. तसेच व्हेंटिलेटर्स देखील कमी पडत आहेत. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे देशात करोना रुग्णांनाचा मृत्यू होत आहे. अशातच ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचा चेन्नईत मृत्यू झाला.

चेन्नई येथील एसआरएम रिसर्च इन्सिट्युटमध्ये डॉ. काकडे कार्यरत होते. या दरम्यान कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन तीन दिवसांतच त्यांना श्वसनास त्रास सुरू झाला. यानंतर शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले.

त्यांना ऑॅक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सर्वानी धडपडत केली. ऑक्सीजनचा उपयोग विविध क्षेत्रात कसा करता येईल याबाबत संशोधन करत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कमावलेल्या आणि तब्बल सात पेटंट घेतलेल्या तरुण संशोधकाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला.

भालचंद्र काकडे यांनी शिवाजी विद्यापीठात रसायनशास्त्र विषयात पदवी घेतली . त्यानंतर त्यांनी ऑक्सिजन व हायड्रोजनचा वापर करून विविध क्षेत्रात काय करता येईल याचे संशोधन सुरू केले. ऑक्सिजन, हायड्रोजन अशा वायूंपासून इंधनपुरक ऊर्जा निर्माण करून त्याव्दारे रेल्वेही धावू शकेल,

असे संशोधन त्यांनी सुरू केले. इंधननिर्मिती व प्लॅटिनमच्या विविध संशोधनात आंतरराष्ट्रीय स्तरावर सात पेटंटही मिळवले आहे.जपान अमेरिका येथील फेलोशिप ही त्यांना मिळाली. यामुळे आंतरराष्ट्रीय संशोधक म्हणून त्यांचे जगभर नाव झाले.

जगभरातील अनेक देशांनी दिलेली ऑफर नाकारून त्यांनी भारतातच संशोधन करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई येथील एसआरएम रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेत ते प्राध्यापक व संशोधक म्हणून कार्यरत होते. दरम्यान कोविड रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर दोन तीन दिवसांतच त्यांना श्वसनास त्रास सुरू झाला.

यानंतर शासकीय कोविड सेंटरमध्ये दाखल केले. त्यांना ऑॅक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधे उपलब्ध करून देण्यासाठी सर्वानी धडपडत केली तब्येत बिघडल्या ने त्यांना चेन्नई येथील एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती सुधारली होती.

ऑक्सिजन क्षेत्रातील हा गुरूतुल्य माणूस कोरोनाचा लक्ष्य ठरला आणि ऑक्सिजनचा सुक्ष्म गुणधर्म शोधणाऱ्या अवलियाला अटीतटीच्या क्षणी ऑक्सिजनच मिळू शकला नाही.

यातच चेन्नईत ज्येष्ठ संशोधक प्रा. डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू झाला जीवघेण्या आजारात ऑक्सिजनची संजीवनी देऊन जीवदान देणाऱ्या हा दिग्गज संशोधक वयाच्या ४४ व्या वर्षातच ऑक्सिजनच्या कमतरतेचा बळी ठरला त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

ते उपचाराला अतिशय चांगला प्रतिसाद ते देत होते. पण, मंगळवारी रात्री उशिरा अचानक त्या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपला. यामुळे तेथे उपचार घेत असलेल्या दहा जणांचा तडफडून मृत्यू झाला. त्यामध्ये काकडे यांचाही समावेश होता.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts