Rohit Pawar : राज्यात सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना त्यांच्या मतदार संघात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्त्यांसह काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
प्रवीण घुले यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांची भेट घेतली होती. तसेच काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आग्रहच धरल्याचे दिसत आहे. काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष प्रवीण घुले यांनी विधानसभा निवडणुकीवेळी रोहित पवार यांना पाठिंबा दिला होता.
मात्र आता प्रवीण घुले यांचा भाजप प्रवेश रोहित पवारांची डोकेदुखी ठरू शकते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. प्रवीण घुले रोहित पवारांना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
प्रवीण घुले यांनी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. राज्यात सरकार आल्यानंतर सर्वांना वाटत होते या तालुक्यात जोश पूर्ण काम होईल. विकासाच्या दृष्टीने अनेक गोष्टी केल्या मात्र दुर्दैवाने कुठली गोष्ट झाली नाही असा आरोपही त्यांनी केला आहे.
तसेच विकास कामाचे बाबतीत सामान्य माणूस आणि पदाधिकाऱ्यांना देखील विश्वासात घेतले जात नव्हते. सर्व पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बोलून दाखवला आहे असेही घुलेंनी सांगितले आहे.
प्रवीण घुले रोहित पवार यांच्यावर नाराज असल्याचे स्पष्ट दिसत आहे. राम शिंदे यांची भेट घेतली असल्यामुळे घुले भाजपमध्ये कधी प्रवेश करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रवीण घुले यांनी रोहित पवार यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, तालुक्याच्या राजकारणातील कामाच्या पद्धती बदलल्या. अधिकाऱ्यांच्या काम करण्याची पद्धत बदलली. सामान्य माणसांना वेठीस धरण्याचे काम अधिकाऱ्यांकडून झाले… अधिकाऱ्यांवर दबाव होता.