ताज्या बातम्या

रोहित पवारांचे कौतुकास्पद काम, सोशल मीडियावर लोकांकडून भरभरून कौतुक

मुंबई : राष्ट्रवादी (Ncp) काँग्रेसचे नेते रोहित पवार (NCP Rohit Pawar) हे नेहमी चांगल्या कामांनी चर्चेत असतात, त्यामुळे नेहमी त्यांचे अनेक स्थरांवरून कौतुकही होत असते.

तसेच रोहित पवार हे सोशल मीडियावरही (social media) प्रचंड ऍक्टिव्ह (Active) असतात, त्यामुळे त्यांनी केलेली कामे ही लोकांपर्यंत पोहचतात, त्यामुळे त्यांच्या कामाची माहिती सर्वाना होते.

सध्याही रोहित पवार यांचे एक ट्विट (Tweet) प्रचंड व्हायरल (Viral) होत असून अनेकजण त्याबद्दल कौतुक करत आहेत. रोहित पवार यांनी मेंदूला मार लागलेल्या ऊसतोड मजूराच्या मुलाचा जीव वाचवला आहे.

याबाबत ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी माहिती दिली असून याचे काही फोटो शेअर (Photo share) केले आहेत. “सांगलीमध्ये ऊसतोडीला गेले असताना दुचाकी अपघातात माझ्या मतदारसंघातील प्रविण फुंदे या चिमुकल्याच्या पायाला फ्रॅक्चर व मेंदूला जबर मार लागला होता.

विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार करण्याकामी लक्ष घातल्याने त्याचे वडील हरिदास फुंदे यांनी आग्रह करून मला घरी बोलावलं.”

“घरी गेल्यानंतर अनपेक्षितपणे माझ्यावर फुलांचा वर्षाव केला. वैद्यकीय उपचारांसाठी गरजूंना नेहमीच मदत करत असतो पण काल अचानक झालेल्या या अनोख्या स्वागताने भारावून गेलो आणि लोकांसाठी अधिक जोमाने काम करण्यास बळ मिळालं.

विशेष म्हणजे प्रविण आता बरा झाला असून त्याला भेटून खूप आनंद वाटला” असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच रोहित पवारांच्या या पोस्टला आत्तापर्यंत हजारो लोकांनी लाईक केलं असून सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts