अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- भाजपचे सरकार असताना मागील काळात शेतीच्या पाण्यासंदर्भात मोठी जलसंधारणचे कामे करण्यावर भर दिला. मोठ्या प्रमाणात बंधा-यांची कामे झाल्याने काही गावे सोडल्यास दोन्ही तालुके स्वयंपुर्ण झाले आहे.
ऊसाचे क्षेत्र वाढले असुन दोन वर्षात वीजेसाठी आंदोलन करावे लागले, अतिवृष्टीचे नुकसान भरपाई अनुदान, पीक विमा या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीने वेळोवेळी आंदोलने केले असले तरी विरोधी सरकारला व अधिका-यांना काहीही देणे घेणे नाही अतिवृष्टीचे २५ कोटी अनुदाना पैकी उर्वरित रक्कमेचा दुसरा हप्ता येणे अजुनही बाकी आहे.
तो अजुन शेतक-यांना मिळालेले नाही पुढील काही दिवसांत होऊ घातलेल्या जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन विरोधकांनी जिल्हा परीषदच्या निधी देतानादेखील ठराविक भागात निधी दिला.
अशी टीका आमदार मोनिकाताई राजळे यांनी केली. राजळे पुढे म्हणाल्या की दोन गट सोडता तालुक्यातील बाकीच्या गटात निधी दिला गेलेला नाही.
कोरोना काळात अडीच वर्षात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी कुठल्याही गावाना भेट दिली नाही फक्त निवडणुका जवळ आल्यावरच काही गावाना सध्या काही निधी देऊन उद्घाटन करण्याचे काम तालुक्यात केले जात आहे.
आम्ही मंजुर केलेल्या विकासकामाचे देखिल आमचे सरकार आहे आम्हीच उद्घाटने करणार अशी भूमिका विरोधक घेत असल्याची टीका आमदार राजळे यांनी केली.