Tiago EV Price Hike : टाटाच्या अनेक कार्सना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. अशात कंपनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असते. काही दिवसांपूर्वी कंपनीने टाटा टियागो इलेक्ट्रिक कार लाँच केली होती.
सर्वात महत्त्वाचे कंपनीची ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. परंतु, आता या कारसाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर आर्थिक ताण येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही कार विकत घेणार असाल तर तिची नवीन किंमत जाणून घ्या.
मोजावे लागणार जास्त पैसे
कंपनीने टाटाच्या टियागोच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटाच्या टियागोची सुरुवातीची किंमत 20,000 रुपयांनी वाढवण्यात आली असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
जाणून घ्या व्हेरियंटची किंमत
कंपनीने Tiago Electric च्या सर्व व्हेरियंटच्या किमती बदलण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. 19.2 kWh बॅटरी पॅक आणि 3.3 kWh चार्जरसह एंट्री-लेव्हल XE व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये असून, XT व्हेरियंटची नवीन किंमत 9.29 लाख रुपये केली आहे.
24KWH बॅटरी पॅक आणि 3.3KW मोटरसह नवीन XT व्हेरियंटची किंमत 10.19 लाख रुपये, XZ Plus 10.99 लाख रुपये, XZ Plus टेक-लक्झरी व्हेरिएंटची किंमत 11.49 लाख रुपये करण्यात आली आहे.
24KWH बॅटरी पॅक आणि 7.2KW मोटरसह येणार्या XZ Plus व्हेरियंटची नवीन किंमत 11.49 लाख रुपये आणि XZ Plus टेक लक्झरी व्हेरिएंटची नवीन किंमत 11.99 लाख रुपये केली आहे.
सुरुवातीला होती ही किंमत
कंपनीने जेव्हा ही कार भारतीय बाजारात लॉन्च केली होती. तेव्हा तिची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये होती. कंपनीने सांगितले होते की केवळ पहिल्या 20 हजार बुकिंगसाठी कारची किंमत 8.49 लाख रुपये असेल, त्यानंतर किंमतीत बदल केला जाणार आहे.
जाणून घ्या बॅटरी आणि श्रेणी
24 kWh ची बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर अंदाजे ही कार 315 किलोमीटर चालवता येते. या कारला 19.2 kWh बॅटरीसह 250 किमीची रेंज मिळते. Tata Tiago EV फास्ट चार्जिंग पर्यायाला सपोर्ट करते. डीसी फास्ट चार्जर वापरून फक्त 58 मिनिटांत 10 ते 80 टक्के बॅटरी चार्ज करता येते.
अशी आहेत फीचर्स
यात कंपनीने रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजीही दिली आहे, जी कारची रेंज वाढवण्यास मदत करते. पुश बटन स्टार्ट, क्रूझ कंट्रोल, ऑटो टेंपरेचर कंट्रोल, इलेक्ट्रिक ओआरव्हीएम, उंची अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रीअर वायपर आणि वॉशर, इलेक्ट्रिक टेलगेट रिलीझ, फॉलो-मी होम लाइट्स, पंक्चर रिपेअर किट, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, लेदरलेट यांचा समावेश असून शिवाय यात अपहोल्स्ट्री सारखी अनेक फीचर्स उपलब्ध आहेत.