अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे करासह कर्ज वसुलीवरही परिणाम झाला. मात्र कोरोनाच्या संकट काळातही नागरिकांनी महापालिकेचा कर भरला.
थकीत करावरील शास्ती माफ केल्यामुळे २०२०-२१ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत मार्चअखेरीस ५८ कोटी रुपये जमा झाले आहेत.
महापालिकेने थकीत करावरील ७५ टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये जाहीर केला होता. ही सवलत १५ डिसेंबर पर्यंत होती.
या काळात मनपाच्या चारही प्रभाग कार्यालयांत २६ कोटींची वसुली झाली. त्यानंतर डिसेंबरमध्ये ५० टक्के शास्ती माफीचा निर्णय झाला.
त्यामुळे डिसेंबरमध्ये ८ कोटींची वसुली झाली. ही सवलत संपु्ष्टात आल्यानंतर मात्र कर वसुलीत घट झाली.
शास्ती माफीमुळे महापालिकेची चालूवर्षीची वसुली झाली. महापालिेकेच्या तिजोरीत ५७ कोटी ८३ लाख रुपये जमा झाले आहेत.
सर्वाधिक ३४ कोटी रुपये नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत जमा झाले असून, शास्ती माफीच्या निर्णयाने महापालिकेला तारले असल्याचे कर वसुलीच्या आकडेवारीरून स्पष्ट झाले आहे.
शास्ती माफीची सवलत असलेल्या नाेव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ३४ कोटी रुपये वसूल झाले. नागरिकांनी रांगेत उभे राहून कर भरला. याशिवाय ७ कोटी रुपये ऑनलाईन जमा झाले.
महापालिकेच्या ११० कर्मचाऱ्यांनी दहा वर्षांत १६ कोटी रुपये जमा केले असून, त्यात स्वत:हून कर भरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.