साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी, या मंत्रावर आमचा विश्‍वास – शालिनीताई विखे पाटील

मी कधीही पदावर असताना राजकारण केले नाही. डॉ. सुजय विखे बारा वर्षे मेडिकल क्षेत्रात काम करून ऑपरेशन करता करता तो राजकारणात कधी आला, हे मलाही कळले नाही; परंतु ही जनतेची सेवा आहे,

निवडून येण्यासाठी पक्ष असतो. पदावर आल्यावर राजकारण विरहित काम करावे लागते, त्यामुळे विखे पाटील परिवाराने आतापर्यंत समाजकारणाचे काम केले असून, साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी, या मंत्रावर आमचा विश्‍वास आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांनी केले. ‘

पोखरी, ता. पारनेर येथे २ कोटी ३० लक्ष रुपये खर्चाच्या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांच्या झाले, या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम कृषी समितीचे मा. सभापती काशिनाथ दाते सर, भा.ज.पा. तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, शिवाजी खिलारी, युवराज पठारे, दत्ता पवार, गंगाधर रोहोकले यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना सौ. विखे म्हणाल्या, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना काढला. पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटलांनी शिक्षण संस्था काढल्या, सहकारी संस्था काढल्या, त्यामुळे गरिबांच्या मुलांना शिक्षण घेता आले.

म्हणून गेली पंच्चेचाळीस वर्षे त्यांना लोकांनी आशीर्वाद दिले. आमच्या परिवाराने पक्षविरहित काम केले. विकासकामे करताना एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. आमच्या लोणी ग्रामपंचायतमध्ये एकदाही निवडणूक झाली नाही.

बिनविरोध सदस्य दिले जातात. गावगाडा चालवायला सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे असते. सरकारकडून मोठा लाडू येतो ; परंतु खाली येईपर्यंत त्याचा भुगा झालेला असतो. हा लाडू चांगला ठेवायचा असेल तर गावचा एकोपा महत्त्वाचा आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून आपण काम केले पाहिजे.

या वेळी काशिनाथ दाते, नगरसेवक युवराज पठारे, तालुकाप्रमुख बंडू रोहोकले, भाजप तालुकाप्रमुख राहुल शिंदे, सतीश पवार, निजाम पटेल, अशोक खैरे यांनी मनोगत केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts