ताज्या बातम्या

Sakshana Salgar : “बिरोबाची खोटी शपथ घेतली, बिरोबा त्यांचा खेळखंडोबा करेल”; सक्षणा सलगर यांचा पडळकरांवर खोचक टीका

उस्मानाबाद : राज्यात आघाडी विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष (NCP) सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गंभीर आरोप केले आहेत.

गोपीचंद पडळकर यांनी सांगली (Sangali) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचं लोकार्पण ड्रोनद्वारे पुष्पअर्पण करुन केले असल्याचा दावा केला. याच मुद्यावरून सक्षणा सलगर यांनी जोरदार टीका देखील केली आहे.

सक्षणा सलगर बोलताना म्हणाल्या, गोपीचंद पडळकर हे आराजकता पसरवून सलोखा व समाजिक सलोखा बिघडवत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांच्या ईशाऱ्यावर पडळकर यांचे काम सुरु, असल्याचा आरोप सक्षणा सलगर यांनी केला आहे. पडळकर यांनी बिरोबाची खोटी शपथ घेतली, बिरोबा त्यांचा खेळखंडोबा करेल अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

आज मी संपूर्ण महाराष्ट्रात टीव्ही चॅनलेच्या माध्यमांमधून भाजपनं गोपीचंद पडळकर यांची नियुक्ती वायफळ बडबड करण्यासाठी आणि हायव्होल्टेज ड्रामा करण्यासाठी केली आहे. त्यांचा हायव्होल्टेज ड्रामा टीव्हीवर पाहिला.

ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ महाराष्ट्राच्या नव्हे तर अखंड भारताचं दैवत आहेत. ज्यांनी या राज्याला देशाला सामाजिक आणि शैक्षणिक मूल्य दिलेली आहेत.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण करण्याचा कार्यक्रम ठरलेला असताना आणि विष्णू माने हे मेंढपाळ बांधव आहेत त्यांना क्रेडिट मिळेल. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत तो कार्यक्रम होणार होता.

राज्यातील मेंढपाळ बांधवांच्या उपस्थित तो कार्यक्रम होणार होता मात्र गोपीचंद पडळकर यांना ते पाहावत नव्हतं आणि अराजकता माजली पाहिजे.

महाराष्ट्रातील (Maharashtra) सलोखा बिघडवण्याचं काम गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे असा आरोप सक्षणा सलगर यांनी पडळकर यांच्यावर केला आहे.

आज विष्णू माने या धनगर बांधवानं पुतळ्याचं बांधकाम करण्यासाठी प्रयत्न केला. ते असताना त्यांचा 2 एप्रिलचा कार्यक्रम ठरला. देशातील राज्यातील नेते तिथं येणार आहेत, हे तुम्हाला बघवत नाही.

हे फडणवीसांच्या इशाऱ्यावर तुम्ही नाचताय. तुमचा अनांगोदी कारभार चाललाय तो देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाननं चाललाय असा देखील आरोप सक्षणा सलगर यांनी केला आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts