Maharashtra news : राज्यसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी करणारे कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
मात्र, आता शिवसेनेने वेगेळी भूमिका घेत आपला तिसरा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे संभाजीराजे यांची अडचण होणार आहे.राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार उभा करणार असल्याचे पक्षाचे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे संभाजीराजे यांना संपूर्ण महाविकास आघाडीचा नव्हे फक्त राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीची शिल्लक मते संभाजीराजे यांना देण्यासंबंधी पवारांनी दर्शविली होती.
त्यामुळे भाजपचा पाठिंबा न घेताही संभाजीराजे निवडून येऊ शकतात. त्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार, अशी चर्चा सुरू झाली असतानाच शिवसेनेन सहाव्या जागेवर दावा केला आहे. तर भाजपचाही या जागेवर आधीपासूनच दावा आहे.