ताज्या बातम्या

Samsung Galaxy A54 5G : ‘या’ दिवशी लाँच होणार समसंगचा 5G स्मार्टफोन, समोर आली माहिती

Samsung Galaxy A54 5G : सॅमसंग आपल्या चाहत्यांसाठी लवकरच एक आनंदाची बातमी देण्याच्या तयारीत आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये सॅमसंग आपला Galaxy A54 5G हा स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार,  Samsung Galaxy A54 5G मध्ये जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन दिले जाऊ शकतात. पाहुयात यामध्ये कोणकोणती फीचर्स मिळणार आहेत.

ही आहे अपेक्षित किंमत

सॅमसंगचा नवीन Galaxy A54 5G मॉडेल क्रमांक SM-A546B सह 3C प्रमाणपत्रावर दिसला आहे. Samsung Galaxy A53 5G ची या फोनची ही अपग्रेडेड आवृत्ती असणार आहे, हा स्मार्टफोन कंपनीने या वर्षी मार्चमध्ये लॉन्च केला असून या फोनची किंमत 34,499 रुपये इतकी आहे. हा फोनदेखील त्याच किंमतीत सादर केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.

स्पेसिफिकेशन

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy A54 ला 6.4-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. डिस्प्ले पंच-होल डिझाइनमध्ये येण्याची शक्यता आहे. तसेच फोनमध्ये ऑक्टा कोअर 2.4Ghz चिपसेट उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे.

त्याचबरोबर फोनमध्ये Exynos 1380 प्रोसेसर मिळू शकतो. Samsung Galaxy A54 Android 13 आधारित One UI 5 सह येईल. स्टोरेजचा विचार केला तर फोनमध्ये 6 GB पर्यंत RAM सह 128 GB स्टोरेज मिळेल.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, ज्यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. तसेच 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगलचा सेकेंडरी सेन्सर आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सरचा तिसरा लेन्स दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यामध्ये 5,100mAh बॅटरी पॅक दिली जाईल तसेच, फोनमध्ये 25W फास्ट यूएसबी टाइप-सी चार्जिंगला सपोर्ट असणार आहे. सॅमसंग फोन 3C सर्टिफिकेशन वर लिस्ट झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत बाजारात लॉन्च केले जातात, असा अंदाज वर्तवला जात आहे की हा स्मार्टफोनही नवीन वर्षात म्हणजेच 2023 च्या सुरुवातीस सादर केला जाईल.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts