Samsung Galaxy S22 : बाजारात सध्या शानदार फीचर्स असणारे 5G फोन लाँच होत आहे. परंतु याच्या किमती खूप जास्त आहेत. जर तुम्हाला स्वस्तात 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.
तुम्ही आता खुप कमी किमतीत Samsung Galaxy S22 हा फोन खरेदी करू शकता. महत्त्वाचे म्हणजे याची मूळ किंमत 85,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्हाला तो 10 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल. Amazon सेलमध्ये तुम्हाला या फोनवर सवलत मिळत आहे. यावर मिळत असणाऱ्या बँक ऑफर, एक्सचेंज ऑफरमुळे तुम्हाला हा फोन 10 हजार रुपयांपेक्षा स्वस्तात खरेदी करता येईल.
तसेच जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला हा स्मार्टफोन 54,950 रुपयांपर्यंत बँक डिस्काउंटसह खरेदी करता येईल. कंपनीचा हा स्मार्टफोन 62,999 – 54950 रुपयांत तुमच्याकडे असेल. म्हणजे तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या संपूर्ण एक्सचेंजवर बँक ऑफरशिवाय 8049 रुपये. परंतु त्यापूर्वी हे लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या स्मार्टफोनची स्थिती आणि ब्रँडवर अवलंबून असणार आहे.
जाणून घ्या Samsung Galaxy S22 फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
स्टोरेजचा विचार केला तर फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. तसेच तुम्हाला त्यात Snapdragon 8 Gen 1 चिपसेट पाहायला मिळेल. कंपनीकडून या फोनमध्ये जबरदस्त डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले ६.१ इंच असून जो फुल एचडी रिझोल्यूशन आणि १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.
यामध्ये 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 50-मेगापिक्सेलच्या मुख्य लेन्ससह 10-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश करण्यात आला आहे. तसेच कंपनी फोनच्या फ्रंटमध्ये सेल्फीसाठी 10-मेगापिक्सेल कॅमेरा देत असून याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 3700mAh बॅटरीने सुसज्ज आहे.
या फोनमध्ये देण्यात आलेली ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. तसेच तुम्हाला 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळेल. कंपनीचा हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित Samsung च्या One UI वर काम करेल. तसेच हा फोन फॅंटम ब्लॅक, व्हाइट आणि ग्रीन अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल .