Samsung Galaxy S23 5G : काही दिवसांपूर्वीच सॅमसंगने Samsung Galaxy S23 5G हा फोन लाँच केला होता. आपल्या सर्व स्मार्टफोनप्रमाणे कंपनीकडून यात शानदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन देण्यात आली आहेत.
जर तुम्हाला हा फोन कमी किमतीत खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सॅमसंगच्या या शक्तिशाली फोनवर 49,000 रुपयांची बचत होऊ शकते. अशी धमाकेदार संधी तुम्हाला फ्लिपकार्टवर मिळत आहे.
जाणून घ्या ऑफर
जर बँक ऑफरचा विचार केला तर, तुम्ही HDFC बँक डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 5,000 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. तसेच तुम्हाला येस बँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारावर 7.5% सवलत मिळेल.
जर एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाले तर तुमचा जुना किंवा सध्याचा फोन एक्सचेंज देऊन 29,150 रुपयांची बचत केली जाऊ शकते, यानंतर या फोनची किंमत 45,848 रुपये इतकी होईल. तर दुसरीकडे, बँक ऑफरचा फायदा जोडून या फोनची किंमत 40,848 रुपये इतकी असणार आहे.
जाणून घ्या फीचर्स
कंपनीकडून या फोनमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला 6.1-इंचाचा फुल एचडी + डायनॅमिक एमोलेड 2X डिस्प्ले दिला जाईल. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिला जात आहे. तसेच तुम्हाला यात शानदार स्टोरेज मिळेल. स्टोरेजचा विचार केला तर यात कंपनीने 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. हा Android 13 वर आधारित One UI 5.1 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
कॅमेरा
जर या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास याचा पहिला कॅमेरा 50 मेगापिक्सलचा, दुसरा कॅमेरा 12 मेगापिक्सल आणि तिसरा 10 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर त्याच्या फ्रंटमध्ये 12-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
किती आहे किंमत?
किमतीबाबत विचार केला तर कंपनीकडून या स्मार्टफोनची किंमत जवळपास 89,999 रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा 5G फोन विकत घ्यायचा असल्यास तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करू शकता.