ताज्या बातम्या

Samsung Galaxy A14 4G : तगडे फीचर्स असणारा Samsung ने लॉन्च केला आगामी फोन, मिळणार शानदार डिस्प्ले

Samsung Galaxy A14 4G : सॅमसंग ही भारतातील आघाडीची टेक कंपनी आहे. कांपनीच्या स्मार्टफोन सतत इतर कंपन्यांच्या स्मार्टफोन्सला टक्कर देत असतात. या कंपनीकडे मोठा चाहतावर्ग आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी सतत नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते.

अशातच कंपनीने आपला आणखी एका नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. ज्याचे नाव Samsung Galaxy A14 4G हे आहे. परंतु, अजूनही या स्मार्टफोनची किंमत जाहीर केली नाही. परंतु, आपल्या नवीन वापरकर्त्यांसाठी यात PLS डिस्प्ले कंपनीने दिला आहे.

किती असणार किंमत

हे लक्षात घ्या की अजूनही Samsung Galaxy A14 4G कंपनीच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केली नाही, परंतु ते मलेशियामध्ये MYR 826 मध्ये विकले जात आहे, म्हणजेच जर ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी केला तर त्यासाठी 15,300 रुपये मोजावे लागतील. वापरकर्त्यांसाठी हा फोन कंपनीने ब्लॅक, सिल्व्हर, ग्रीन आणि गडद लाल रंगांमध्ये सादर केला आहे. तर कंपनीचे Samsung Galaxy A14 चा 5G व्हेरिएंट भारतात 16,499 रुपयांच्या किमतीत खरेदी करता येत आहे.

असे असणार स्पेसिफिकेशन

कंपनीने आगामी फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.6-इंचाचा PLS LCD डिस्प्ले दिला आहे. तसेच स्टोरेजचा विचार केला तर फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसरसह 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिले आहे. यात MediaTek Helio G80 प्रोसेसरसह Android 13 आधारित One UI 5.0 आहे. यात तीन मागील कॅमेरे असणार आहेत ज्यात प्राथमिक लेन्स 50 मेगापिक्सेल आहे. तर दुसरी लेन्स 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि तिसरी लेन्स 2 मेगापिक्सेल आहे. समोर 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

जर याच्या कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ 5.1, GPS, NFC आणि Type-C पोर्ट आहे. फोनसोबत फिंगरप्रिंट सेन्सर, 3.5mm हेडफोन जॅक आणि 5000mAh बॅटरी दिली आहे, ज्यासह तो 15W चार्जिंगला सपोर्ट करतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts