Samsung Galaxy : बाबो…! सॅमसंग ‘या’ फोनवर देत आहे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त सूट, बँक ऑफरही लागू…

Samsung Galaxy : जर तुमचा सध्या फोन खरेदीचा विचार असेल तर तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची आहे. सॅमसंग कंपनी आपल्या एका फोनवर मोठी सूट ऑफर करत आहे, कपंनीच्या या फोनवर तुम्ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त सूट मिळवू शकता, कंपनी ही ऑफर कोणत्या फोनवर देत आहे, तसेच ही ऑफर कधीपर्यंत लागू आहे, जाणून घ्या…

आम्ही सध्या Samsung Galaxy S21 FE 5G फोनबद्दल बोलत आहोत, जो सॅमसंगच्या सर्वोत्तम हँडसेटपैकी एक आहे. या फोनची मूळ किंमत 69999 रुपये आहे. तर या फोनवर कपंनी 57 टक्के डिस्काउंट देत आहे, डिस्काउंटनंतर त्याची किंमत 29,999 रुपयांवर आली आहे. या फोनवर आणखी काय ऑफर आहे पाहूया…

या फोनवर 57 टक्के डिस्काउंट व्यतिरिक्त फ्लिपकार्टवरून तुम्ही बँक ऑफर देखील मिळवू शकता. हा फोन खरेदी करताना ॲक्सिस बँक सिग्नेचर क्रेडिट कार्डने वापरल्यास तुम्हाला झटपट 2500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तर Samsung Axis Bank Infinite क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांना 5000 रुपयांपर्यंत सूट मिळेल.

त्यामुळे जर तुम्ही बँकेच्या ऑफरचा फायदा घेतला तर फोनची किंमत आणखी कमी होईल. तसेच कूपन आणि कॅशबॅकद्वारे तुम्हाला 4000 रुपयांची सूट देखील मिळू शकते.

फोनवर 23,800 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. पण लक्षात ठेवा एक्सचेंज ऑफरमध्ये जुन्या फोनची किंमत त्याच्या कंडिशन आणि मॉडेलच्या आधारावर ठरवली जाते. जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करत असाल तर ही डील तुमच्यासाठी स्वस्तही होईल.

Galaxy S21 FE हा 5G फोन आहे, ज्यामध्ये 8 GB रॅमसह 128 GB स्टोरेज असेल. फोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. यात 12MP 12MP 8MP (OIS) कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फ्रंटमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आला आहे. Galaxy S21 FE 5G फोनमध्ये 4500 mAh लिथियम आयन बॅटरी आहे.

Renuka Pawar

Recent Posts