Samsung Smartphone Offer : 46 हजारांचा फोन 15 हजारांपेक्षा स्वस्तात करा खरेदी, 256GB स्टोरेजसह मिळेल शक्तिशाली प्रोसेसर

Samsung Smartphone Offer : तुम्हाला आता 256GB स्टोरेज आणि शक्तिशाली प्रोसेसर असणारा स्मार्टफोन खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. कंपनीच्या वेबसाइटवर अशी ऑफर मिळत आहे.

या सेलमध्ये तुम्ही Samsung Galaxy A54 5G हा फोन खरेदी करू शकता. या फोनची मूळ किंमत 45,999 रुपये आहे. परंतु कंपनीचा फोन 37,499 रुपयांमध्ये डिस्काउंटनंतर तुम्ही खरेदी करू शकता. बँक ऑफरमध्ये हा फोन 2,000 रुपयांनी स्वस्त होईल.

तुम्हाला आयसीआयसीआय बँक कार्डद्वारे पेमेंट करावे लागणार आहे. तसेच कंपनी या शानदार फोनवर 22,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. परंतु हे लक्षात ठेवा की एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे. जर तुम्हाला तुमच्या जुन्या फोनचे संपूर्ण एक्सचेंज मिळाल्यास हा फोन 15,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुमचा असेल.

जाणून घ्या फीचर्स

सॅमसंगने या 5G फोनमध्ये 1080×2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.4 इंच फुल एचडी सुपर AMOLED डिस्प्ले दिला आहे. तसेच फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.

स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध असून तुम्हाला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी 1 टीबी पर्यंत वाढवता येईल. तसेच कंपनी या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर देत असून फोटोग्राफीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.

50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा 12-मेगापिक्सेल आणि 5-मेगापिक्सेल कॅमेरा, सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सेल कॅमेरा मिळत आहे. या फोनमधील बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 21 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक वेळ देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

तसेच हा फोन Android OS वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी, यात 802.11 a/b/g/n/ac/ax 2.4G 5GHz, Bluetooth 5.3, USB 2.0, USB Type-C earjack, NFC आणि GPS सारखे पर्याय दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts