Samsung Smartphone Offer : ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा सॅमसंगचा जबरदस्त फोन, मिळतील प्रीमियम फीचर्स

Samsung Smartphone Offer : तुम्ही आता सॅमसंगचा जबरदस्त फोन मूळ किमतीपेक्षा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर तुमची हजारो रुपयांची बचत करू शकता. सर्वात स्वस्त किमतीत प्रीमियम वैशिष्ट्ये तुम्हाला मिळतील.

सॅमसंगचा फॅन एडिशन फोन Galaxy S21 FE 5G ची लोकप्रियता पाहून तो अपडेटेड प्रोसेसरसह लॉन्च केला आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि फीचर्स अल्ट्रा-प्रीमियम दिले आहेत. या फोनवर गोरिल्ला ग्लास व्हिक्टस संरक्षण आणि 120Hz रिफ्रेश रेटसह मोठा AMOLED डिस्प्ले दिला आहे. तसेच या फोनमध्ये प्रो-ग्रेड कॅमेरा सिस्टिम दिली आहे.

स्वस्तात खरेदी करा हा फोन

किमतीचा विचार केला तर फॅन एडिशन डिव्हाइसची भारतीय बाजारपेठेत लॉन्च किंमत 69,999 रुपये असून फ्लिपकार्ट सेलमुळे त्यावर 52% फ्लॅट डिस्काउंट मिळेल. 37000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 32,999 रुपयांना लिस्ट झाला असून कोटक बँक, आरबीएल बँक, एसबीआय आणि इतर निवडक बँक कार्डद्वारे पेमेंट केले तर 10% पर्यंत अतिरिक्त सवलत मिळेल. त्यानंतर त्याची किंमत 30 हजार रुपये असणार आहे.

ग्राहकांना त्यांचा जुना फोन एक्स्चेंज करून यावर 32,000 रुपयांपर्यंत कमाल एक्स्चेंज सवलत मिळेल. या एक्सचेंज सवलतीचे मूल्य तुम्ही एक्सचेंज करत असणाऱ्या जुन्या फोनचे मॉडेल आणि स्थिती यावर अवलंबून असणार आहे. उपकरण ग्रेफाइट, लॅव्हेंडर, नेव्ही, ऑलिव्ह आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांत खरेदी करता येईल.

जाणून घ्या खासियत

सॅमसंगच्या या 5G फोनमध्ये 6.4 इंच फुल एचडी डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दिला असून तो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आहे. स्टोरेजचा विचार केला तर 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आणि OneUI Android 13 वर आधारित असेल. मागील पॅनलवर ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सपोर्टसह 12MP 12MP 8MP ट्रिपल कॅमेरा तसेच 32MP फ्रंट कॅमेरा आहे. या स्मार्टफोनची 4500mAh बॅटरी फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts