Sanjay Raut : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे देशात काँग्रेस आक्रमक झाली आहे. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची देखील खासदारकी जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाच्या कारवाईला वेग आला आहे.
राऊत यांच्याविरोधातील हक्कभंगाचा प्रस्ताव विधानपरिषदेत मांडण्यात आला. विधिमंडळाचा अपमान करणारे वक्तव्य केल्याचा आरोप राऊत यांच्यावर करण्यात आला आहे. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत हे राज्यसभेतचे खासदार असल्याने विधिमंडळातील हक्कभंग समितीला त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे हा प्रस्ताव आज राज्यसभेकडे अर्थात उपराष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. यामुळे आता त्याठिकाणी काय निर्णय होणार हे लकरच समजेल.
संजय राऊत यांच्यासंदर्भातील निर्णय आता केंद्र सरकारच्या हाती असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता राहुल गांधींप्रमाणे संजय राऊत यांचीही खासदारकी जाते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. यामुळे ठाकरे गट सध्या चिंतेत आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. यामुळे आता संजय राऊत यांची खासदारकी गेली तर मोठा राडा होण्याची शक्यता आहे.