नवी दिल्ली : राज्यात नुकतीच राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha elections) पार पडली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) ३ आणि भाजपचे (BJP) ३ असे उमेदवार निवडून आले. मात्र भाजपने यावेळी जोर दाखवल्याचे दिसून आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut)
यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.किरीट सोमय्या (Kirit somaiya) म्हणाले, राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांनी आमदारांना थेट बंदूक दाखवूनच धमकी दिली. राज्यसभा निवडणूकीत आमदारांवर दबाव आणण्यासाठी शिवसेना आणि संजय राऊत यांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले.
यात त्यांना धमकावण्यापर्यंत मजल गेल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. राज्यसभेची ही निवडणूक शिवसेनेने भ्रष्ट केल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे.
या प्रकरणी दिल्लीत आज त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार दाखल केली आहे. आता निवडणूक आयोगामार्फत सोमय्यांच्या आरोपांची काय दखल घेतली जाते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, या निवडणुकीत सर्व आमदारांनी मतदान केले. मात्र आपल्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील आमदारांवर मोठा दबाव आणल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
एवढंच नाही तर संजय राऊत यांनी थेट आमदारांना (MLA) बंदूक दाखवून धमकीच दिल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. अशा आशयाची तक्रारही त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयामार्फतही आमदारांवर दबाव आणला जात असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.