ताज्या बातम्या

संजय राऊतांचे संभाजी छत्रपतींना राज्यसभेच्या जागेवरून मोठं विधान, संभाजीराजेंच टेन्शन वाढलं

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना राज्यसभेच्या (Rajyasabha) जागेवरून स्पष्टीकरण दिले असून संभाजीराजेंचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग कठिण होताना दिसत आहे.

संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackeray) यांची भेट घेतली. तब्बल दोन ते अडीच तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असून त्यांनतर त्यांनी याबाबत स्पष्ट मत मांडले आहे.

राऊतांनी सांगितले की, राज्यसभेच्या जागेबाबत कोणतीही खलबतं झाली नाही. मात्र, राज्यसभेची सहावी जागा शिवसेनाच लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

मात्र, संभाजी छत्रपतींना राज्यसभेवर जायचं असेल तर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा या अटीचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांचं टेन्शन वाढलं असून राज्यसभेवर जाण्याचा त्यांचा मार्ग कठिण होताना दिसत आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या जागेबाबत कोणतीही खलबतं झाली नाही. उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय आम्हाला माहीत आहे. तो जो निर्णय जाहीर करतील तो पक्ष पुढे नेईल. खास त्याच विषयावर चर्चा झाली असे नाही. इतर विषयांवर चर्चा झाली. यावेळी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) उपस्थित होते. शिवसेनेचे आमदारही उपस्थित होते, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

तसेच शिवसेनेकडून राज्यसभेवर कुणाला पाठवण्यात येणार आहे? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर खूप नावं चर्चेत असतात. चर्चा होत असते. त्यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असं त्यांनी स्पष्ट केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts