ताज्या बातम्या

Sarkari Yojana Information : तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचेत? तर या सरकारी योजनेत करा गुंतवणूक, होईल फायदा

Sarkari Yojana Information : तुमच्याजवळ पैसे (Money) आहेत पण तुम्हाला त्या पैशाचे काय करायचे समजत नाही? तसेच पैसे कुठे गुंतवायचे (Invest) आणि फायदा कसा मिळवायचा या गोष्टी माहिती नाहीत?

तसेच एखाद्या योजनेत पैसे गुंतवणूक (Investing money) करून गमवायची भीती आहे? तर आज तुम्हाला अशी एक योजना (Plan) सांगणार आहोत ज्यामधून तुम्हाला अधिक नफा होऊ शकतो.

पैसा आहे, पण काम नाही, काय करू, काही समजत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे पैसे अशा ठिकाणी गुंतवू शकता जिथे तुमचे पैसे दुप्पट होतील. ही अशी योजना आहे ज्यामध्ये बुडण्याचा धोका नाही.

एफडी असो वा आरडी किंवा शेअर मार्केट आजकाल लोक सर्वत्र आपले पैसे गुंतवत आहेत. प्रत्येक गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीतून चांगल्या परताव्याची अपेक्षा करतो.

त्याच वेळी, जिथे लोकांना अशा योजनेत पैसे गुंतवायचे आहेत जिथे पैसे दुप्पट होऊ शकतात, तर अशीच एक योजना आहे. किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) ही पोस्ट ऑफिसची योजना आहे.

ही एक छोटी बचत योजना आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची रक्कम दुप्पट करू शकता. ही एक निश्चित दर बचत योजना आहे. या योजनेत गुंतवणूक केल्याने, तुमची रक्कम १२४ महिन्यांत (१० वर्षे आणि ४ महिने) दुप्पट होईल.

KVP सध्या 6.9 टक्के वार्षिक चक्रवाढ व्याज दर देत आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. यामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही.

या योजनेत कोणत्याही वयाची व्यक्ती खाते उघडू शकते. वयाची 10 वर्षे पूर्ण केल्यानंतर अल्पवयीन मुले यामध्ये गुंतवणूक करू शकतात. त्याचे प्रमाणपत्र देशभरातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून मिळू शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts